Oscars 2024 Live Updates : सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म ठरली '20 डेज इन मारियुपोल'; 'ऑस्कर 2024' सोहळ्यातील प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर
Oscars 2024 Live Updates : हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत असंख्य कलाकार आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत असतात. यंदाच्या ऑस्कर (Oscar 2024) पुरस्कार सोहळ्याची भारतीयांमध्येही फार उत्सुकता आहे.
LIVE
Background
Oscars 2024 Live Updates : जगभरातील सिनेप्रेमी ऑस्कर पुरस्कार (Oscar Award 2024) सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अवघ्या काही तासांत या सोहळ्याच्या विजेत्यांची घोषणा होणार आहे. 'ऑस्कर 2024' (Oscar 2024) हा पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये 10 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.अमेरिकेतील रेड कार्पेटवर रविवारी रात्री हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. तर भारतात सोमवारी सकाळी 11 मार्च 2024 रोजी या पुरस्कार सोहळ्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
अँड द ऑस्कर गोज टू… हे शब्द ऐकण्यासाठी हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत असंख्य कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या ऑस्कर (Oscar 2024) पुरस्कार सोहळ्याची भारतीयांमध्येही फार उत्सुकता आहे. विनोदवीर जिमी किमेल (Jimmy Kimmel) चौथ्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्यासाठी उत्सुक आहेत.
'ऑस्कर 2024'मध्ये 'ओपनहायमर'ला सर्वाधिक नॉमिनेशन
क्रिस्टोफर नोलनच्या (Christopher Nolan) 'ओपनहायमर' (Oppenheimer) या ब्लॉकबस्टर सिनेमाला 'ऑस्कर 2024'मध्ये सर्वाधिक नामांकन मिळालं आहे. या सिनेमाला एकूण 13 नामांकन मिळाले आहेत.
भारताच्या 'टू किल अ टायगर' माहितीपटाला नामांकन
भारताच्या 'टू किल अ टायगर' (To Kill a Tiger) या माहितीपटाला 'ऑस्कर 2024'मध्ये नामांकन मिळालं आहे. झारखंड राज्यातील एका छोट्या गावावर आधारित हा माहितीपट आहे. या माहितीपटात एका 13 वर्षीय मुलीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. त्यानंतर मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांचा संघर्ष या माहितीपटात दाखवण्यात आला आहे.
Oscars 2024 on Nitin Desai : ऑस्कर सोहळ्यात देसाईंना आदरांजली
Oscars 2024 on Nitin Desai : दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना ऑस्कर चित्रपट सोहळ्यात आदरांजली वाहण्यात आली. इन मेमोरियम नावाच्या सत्रात जगभरातील यशस्वी दिवंगत कलावंतांचं स्मरण केलं जातं. त्यामध्ये यंदा नितीन देसाई यांचा देखील उल्लेख करण्यात आला. 2 ऑगस्ट रोजी देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं. लगान हा चित्रपट 2002 साली ऑस्करला गेला होता. त्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई होते. स्लमडॉग मिलियोनेर या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं होतं.
Oscars 2024 Live update : ओपनहायमर ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
Oscars 2024 Live update : 'ऑस्कर 2024'मध्ये ओपनहायमर हा सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
To close out the night, the Academy Award for Best Picture goes to... 'Oppenheimer'! #Oscars pic.twitter.com/nLWam9DWvP
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
Oscars 2024 Live : एमा स्टोन ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
Oscars 2024 Live : ख्रिस्तोफर नोलन ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक!
Oscars 2024 Live : 'ऑस्कर 2024'मध्ये ख्रिस्तोफर नोलन ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला आहे.
Oscars 2024 Live update : सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
Oscars 2024 Live update : सिलियन मर्फीने ‘ओपेनहाइमर’मधील त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकला आहे.