एक्स्प्लोर

Oscar Nominations 2023: ऑस्करमध्ये आरआरआरचा धमाका!  नाटू नाटू गाण्याला मिळालं नॉमिनेशन

Best Score Academy Award : नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल साँग्स या गटात नामांकन मिळालं आहे.

Oscar Nominations 2023: एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाची भुरळ अद्यापही कायम आहे. या चित्रपटातील नाटू नाटू (Natu Natu Songs) या गाण्याला ऑस्करमध्ये (Oscar Nominations 2023) ओरिजनल साँग्स या गटात (Best Score Academy Award)नामांकन मिळालं आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांनी आरआरआर या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. यामधील नाटू नाटू हे गाणं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. या गाण्याची जादू अद्यापही कायम आहे. या गाण्यावर अनेकजण थिरकले आहेत. आता या गाण्याला ओरिजनल साँग्स या गटात ऑस्करमध्ये नामांकन मिळालं आहे.

एसएस राजामौली यांचा आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाची भूरळ पाहायला मिळाली होती. यातील गाण्यांनी सर्वांची मनं जिंकली होती. अवतार चित्रपटाचे निर्माते जेम्स कॅमरुन यांनाही हा चित्रपट आवडला होता. त्यांनी राजामौली यांचं कौतुक केले होते. 

युक्रेनमध्ये झाले शूटिंग
नाटू-नाटू या गाण्याचे शूटिंग युक्रेनमधील वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर करण्यात आले आहे. याबद्दल दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती. तसेच आरआरआर चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन देखील युक्रेनमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते.

गोल्डन ग्लोब पुरस्कारावरही कोरलेय नाव -
नाटू नाटू या गाण्यानं नुकताच गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार पटकावला होता. संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्विकारला. यावेळी पुरस्कार स्विकारल्यानंतर एम एम कीरावानी यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले होते की, 'हा पुरस्कार आम्हाला दिल्याबद्दल मी आभार मानतो. मला खूप आनंद होत आहे. हा पुरस्कार आरआरआर या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आहे. त्यांनी माझ्या कामावर विश्वास ठेवला तसेच त्यांनी मला सपोर्ट केला, याबद्दल मी त्याचे आभार मानतो.' यावेळी आरआरआर चित्रपटाच्या टीमनं टाळ्यांचा कडकडाट केला होता.

गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली होती. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला आहे. तसेच  बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) या कॅटेगिरीमधील पुरस्कारही आरआरआर या चित्रपटाला मिळाला होता.  

पाहा तेलगु गाणं

पाहा हिंदी गाणं....

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Golden Globe Awards 2023: कौतुकास्पद! आरआरआरमधील 'नाटू नाटू' गाण्यानं पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट साडपलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Embed widget