Golden Globe Awards 2023: कौतुकास्पद! आरआरआरमधील 'नाटू नाटू' गाण्यानं पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील (Golden Globe Awards 2023) बेस्ट ओरिजिनल साँग हा पुरस्कार 'आरआरआर' (RRR) मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला आहे.
Golden Globe Awards 2023: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला (Golden Globe Awards 2023) सुरुवात झाली आहे. 'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली आहेत. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू (Naatu Naatu) या गाण्यानं पटकावला आहे. तसेच बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) या कॅटेगिरीमधील नामांकन देखील आरआरआर या चित्रपटाला मिळाल आहे.
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार नाटू नाटू या गाण्यानं पटकावला आहे. संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार स्विकारला. यावेळी पुरस्कार स्विकारल्यानंतर एम एम कीरावानी यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 'हा पुरस्कार आम्हाला दिल्याबद्दल मी आभार मानतो. मला खूप आनंद होत आहे. माझी पत्नी यावेळी उपस्थित आहे. हा पुरस्कार आरआरआर या चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आहे. त्यांनी माझ्या कामावर विश्वास ठेवला तसेच त्यांनी मला सपोर्ट केला, याबद्दल मी त्याचे आभार मानतो.' यावेळी आरआरआर चित्रपटाच्या टीमनं टाळ्यांचा कडकडाट केला.
पाहा व्हिडीओ:
And the GOLDEN GLOBE AWARD FOR BEST ORIGINAL SONG Goes to #NaatuNaatu #GoldenGlobes #GoldenGlobes2023 #RRRMovie
— RRR Movie (@RRRMovie) January 11, 2023
pic.twitter.com/CGnzbRfEPk
INDIAAAAAAAA…. THIS IS THE BEST NEWS to WAKE UP TO!! 🇮🇳🇮🇳🇮🇳#NaatuNaatu becomes the first ever Asian song to win a #GoldenGlobes . 🤘🏻🌋 #RRRMovie pic.twitter.com/LXHZqhmNaY
— RRR Movie (@RRRMovie) January 11, 2023
MM Keeravaani’s #GoldenGlobes2023 acceptance Speech!! ❤️🔥❤️🔥 #RRRMovie #NaatuNaatu pic.twitter.com/9q7DY7Pn5G
— RRR Movie (@RRRMovie) January 11, 2023
गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याला आरआरआर या चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली आहे. अभिनेता राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर वॉक देखील केला.
आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.एसएस राजामौली यांच्या या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: