Maharashtrachi Hasyajatra : 'क्रिकेट काय शिकवतं?' आरसीबी क्वॉलिफाय झाल्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
Maharashtrachi Hasyajatra : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात बंगळूरुचा संघ क्वॉलिफाय झाल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Onkar Raut : आयपीएल 2024 (IPL 2024) च्या हंगमात यंदाच्या क्लॉलिफायरच्या यादीत बंगळूरुच्या (Royal Challengers Bengaluru) संघाचंही नाव आहे. आयपीएलच्या एकदाही बंगळुरुच्या संघाला विजेतेपदाचा किताब पटकावला नाहीये. पण यंदाच्या क्वॉलिफायर यादीमध्ये आरसीबी संघाने आपलं स्थान निर्माण केलं आहे. चेन्नईच्या संघाचा पराभव करुन आरसीबी क्वॉलिफाय झाली. त्यानंतर अनेकांनी विराट कोहलीसाठी पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. त्यावर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम अभिनेता ओंकार राऊत (Onkar Raut) याने देखील पोस्ट केली आहे.
ओंकारने त्याच्या सोशल मीडियावर विराट कोहलीसाठी एक पोस्ट केली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ओंकार राऊत हा घराघरात पोहचला. या कार्यक्रमातील त्याची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पंसतीस पडली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) सामन्यात बंगळुरुने 27 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बंगळुरुने प्ले ऑफच्या फेरीत स्थान मिळवलं.
ओंकारची पोस्ट काय?
ओंकारने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं की, क्रिकेट काय शिकवतं? विराट कोहली सांगतो एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त 1 टक्का शक्यता असेल तर, अनेकदा ती 1 टक्का शक्यता देखील पुरेशी असते” यामध्ये त्याने विराह कोहलीच्या देखील नावाचा उल्लेख केला असल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
विराट कोहलीचा भीमपराक्रम
विराट कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 3 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकाही मैदानावर 3 हजार धावा करण्याचा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आलेला नाही. आकडेवारीवर नजर टाकली तर विराट कोहलीच्या जवळ कोणीही नाही. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर 2295 धावा केल्या आहेत.