Alia First Telugu Film | 'RRR' नाही तर 'गंगूबाई काठियावाडी' असणार Alia Bhatt चा पहिला तेलुगु चित्रपट
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट आता तेलुगु भाषेत रिलीज करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीडर पवन कल्याणच्या वकील साब या तेलुगु चित्रपटाबरोबर रिलीज करण्यात येणार आहे.

मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली RRR या तेलगु चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. परंतु 13 ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या 'RRR' या चित्रपटाअगोदर आलिया तेलुगु भाषेत डब केल्या जाणाऱ्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू प्रेक्षकांसमोर येणार आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट आता तेलगू भाषेत रिलीज करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीजर पवन कल्याणच्या वकील साब या तेलुगुचित्रपटाबरोबर रिलीज करण्यात येणार आहे.
आलिया भट्टने स्वत: या विषयी माहिती देणारा एक छोटा व्हिडीओ तेलगू भाषेत बनवला आहे. ज्यामध्ये आलिया तेलुगु भाषेत बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आलियाने पवन कल्याण आणि 'वकिल साब'च्या पूर्ण टीमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत
गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट तमिळ भाषेत रिलीज करण्याचा निर्णय अगोदरच घेण्यात आला होता. परंतु तेलुगु भाषेत रिलीज करण्याचा निर्णय हा आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधील हिंदी चित्रपटाचा चाहता वर्ग आधारित घेण्यात आला आहे.
आलिया भट्टने संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून डेब्यू केला होता. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित सांगितला जात आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सुरुवातीला हा सिनेमा 11 सप्टेंबर, 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे हा चित्रपट आता 30 जुलै, 2021 रोजी देशभरात प्रदर्शित केला जाईल.
या चित्रपटात अजय देवगण छोट्याशा पण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण आणि संजय लीला भन्सानी यांनी 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं होतं, जो 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता.
संबंधित बातम्या :
Gangubai Kathiawadi: इज्जतीत जगायचं, कोणाच्या बापाला घाबरायचं नाय; माफिया डॉन झालेल्या आलियाचा डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल
आलिया भट्टचा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'चा टीझर रिलीज, सोशल मीडियावर धुमाकूळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
