Nora Fatehi Dance in Mumbai Metro : नोरा फतेहीनं मुंबईत मेट्रोत केला 'झिंगाट' डान्स, पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लावला टीकेचा सूर, म्हणाले....
Nora Fatehi Dance in Mumbai Metro : नुकतीच नोरा मुंबई मेट्रोमध्येही डान्स करताना दिसली होती, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यासाठी लोकांनी नोराला चांगलचं धारेवर धरलं.
![Nora Fatehi Dance in Mumbai Metro : नोरा फतेहीनं मुंबईत मेट्रोत केला 'झिंगाट' डान्स, पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लावला टीकेचा सूर, म्हणाले.... Nora Fatehi Bollywood Actress Dance in Mumbai Metro video Viral on Social Media also get trolled on her dance detail marathi news Nora Fatehi Dance in Mumbai Metro : नोरा फतेहीनं मुंबईत मेट्रोत केला 'झिंगाट' डान्स, पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लावला टीकेचा सूर, म्हणाले....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/11/b4e5c051e64371bb5e40fff496f5c8ac1710146271784720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nora Fatehi Dance in Mumbai Metro : नोरा फतेही (Nora Fatehi) ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधली डान्सिंग क्विन म्हणून ओळखली जाते. तसेच तिच्या डान्सिंग मुव्ह्जमुळे नोरा कायमच चर्चेत राहिलीये. डान्स रिॲलिटी शोमध्ये सहभागी होण्यापासून ते टीव्हीवर प्रसिद्ध जज होण्यापर्यंत नोराने खूप मोठा पल्ला गाठला आहे.तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले असून आता ती आता 'मडगाव एक्सप्रेस' (Madgoan Express) या चित्रपटात झळकणार आहे. इतकं सगळं असूनही नोरा कायमच ट्रोर्लसच्या निशाण्यावर येते. नुकतच नोराने मुंबई मेट्रोत केलेल्या डान्समुळे चर्चेत आलीये.
सध्या नोराचा मेट्रोतील हा डान्स तुफान व्हायरल झालाय. यावेळी नोरा मेट्रोतून प्रवास करतानाही पाहायला मिळाली. तिने ॲनिमल प्रिंटेड ड्रेस घातला आहे आणि तिने ओपन हेअर ठेवलेत. मेट्रोची सुरक्षा तपासणी करुन नोराने मुंबई मेट्रोत प्रवेश केला. त्यानंतर ती चालत्या ट्रेनमध्ये इतर प्रवाशांसोबत डान्स करताना दिसली आणि तिची प्रसिद्ध स्टेप ऑफ ट्वर्किंगही केली. नोराने मराठमोठ्या झिंगाट गाण्यावर मेट्रोत डान्स केला. पण तिचा हा स्टंट नेटिझन्सच्या पसंतीस उतरला नसल्याचं चित्र आहे.
मेट्रोतील नोराचा डान्स बघून नेटकरी संतापले
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच अनेक नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत कमेंट सेक्शनमध्ये भडिमार केला. तसेच नोराचा हा डान्स नेटकऱ्यांच्या अजिबातच पसंतीस उतरला नसल्याचं चित्र आहे. सोशल मीडिया यूजर्सना नोराचा हा डान्स आवडला नाही आणि त्यावर नेटकऱ्यांनी टीकाही केली. एका युजरने यावर कमेंट करत म्हटलं की, 'ती कधीच चांगले कपडे का घालू शकत नाही?' एकाने लिहिले, 'तुम्ही मेट्रोमध्ये का नाचत आहात?' दरम्यान, तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'स्वस्त नौटंकी.' एकजण म्हणाला, 'चित्रपटासाठी इतकी वल्गारिटी.'
View this post on Instagram
नोराने स्टेजवर केला जबरदस्त परफॉर्मन्स
सध्या नोरा तिच्या आगामी मडगाव एक्सप्रेस चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याआधी नोराने 'डान्स प्लस प्रो' या कार्यक्रमात केलेल्या डान्समुळे चर्चेत आली होती. रेमो डिसूजा, शक्ती मोहन, पुनित पाठक आणि राघव जुयाल या शोचे जज आहेत. सोशल मीडियावर तिच्या या डान्सची जोरदार चर्चा होती. या व्हिडिओमध्ये नोरा तिच्या नाच मेरी जान या गाण्यावर थिरकताना दिसली. तिचा हा डान्स पाहून सर्वांनाच धक्का बसला होता.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)