(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kratika Sengar, Nikitin Dheer : निकितिन धीर आणि कृतिका सेंगर झाले आई-बाबा; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
निकितिन धीर (Nikitin Dheer) आणि कृतिका सेंगर (Kratika Sengar) हे आई-बाबा झाले आहे.
Kratika Sengar, Nikitin Dheer : प्रसिद्ध अभिनेता निकितिन धीर (Nikitin Dheer) आणि त्याची पत्नी कृतिका सेंगर (Kratika Sengar) हे आई-बाबा झाले आहे. त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. निकितिननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही गुड न्यूज चाहत्यांना दिली. कृतिकानं तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता ही आनंदाची बातमी निकितिननं दिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
निकितिननं 'शेरशाह', 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'सूर्यवंशी' या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच तो प्रसिद्ध अभिनेता पंकज धीर यांचा मुलगा आहे. 'महाभारत'मध्ये निकितिननं प्रमुख भूमिका साकारली आहे. निकितिननं बॉलिवूडबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केलं आहे.
निकितिनची पत्नी कृतिका सेंगर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'छोटी सरदारनी' या मालिकेमुळे कृतिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. 3 डिसेंबर 2014 रोजी निकितिन आणि कृतिका यांनी लग्नगाठ बांधली. लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर कृतिका आणि निकितिन यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले.
View this post on Instagram
निकितन धीरनं 'जोधा अकबर' या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. एकता कपूरच्या 'नागिन 3' या मालिकेमध्ये देखील निकितिननं प्रमुख भूमिका साकारली.
हेही वाचा :
- Deepika Padukone : Louis Vuitton ब्रॅंडची दीपिका पदुकोण ब्रँड अॅम्बेसेडर; अशी निवड झालेली पहिलीच भारतीय महिला
- Jacqueline Fernandez : ‘फक्त IIFA पुरस्कारांत सामील होऊ द्या!’, ईडीने पासपोर्ट जप्त केल्याने जॅकलिनची कोर्टात धाव!
- Cannes Film Festival 2022 : रेड कार्पेटवर दिसणार हिना खानचा जलवा! ‘कान्स’मध्ये सामील होणार टीव्ही अभिनेत्री!