Neena Gupta On Pamela Anderson: 'तिचे जेवढे मोठे आहेत, तेवढे माझे नाहीत...'; नीना गुप्ता यांची चारचौघात प्रसिद्ध अभिनेत्रीच्या छातीवर कमेंट
Neena Gupta On Pamela Anderson: नीना गुप्ता एक दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री. त्यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक सर्वोत्तम चित्रपट दिले आहेत. पण नेहमीच त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिल्या.

Neena Gupta On Pamela Anderson: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री नीना गुप्ता (Bollywood Actress Neena Gupta) आपल्या सडेतोड आणि बोल्ड वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडच्या सिनेमांसोबतच ओटीटीवरही नीना गुप्ता यांनी आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. सध्या आगामी 'पंचायत 3' (Panchayat Season 3) वेब सीरिजमुळे (Web Series) नीना गुप्ता चर्चेत आहेत. याआधी या सीरिजचे दोन्ही सीझन हिट झालेले आहेत. आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. सीरिजमधील मंजू देवींची भूमिका चांगलीच गाजली. नीना गुप्ता यांनी ही भूमिका साकारली आहे. नीना गुप्ता यांच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं आहे. अशातच आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत असणाऱ्या नीना गुप्ता सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत.
नीना गुप्ता (Neena Gupta) एक दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री. त्यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक सर्वोत्तम चित्रपट दिले आहेत. पण नेहमीच त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिल्या. अशातच आता, नीना गुप्ता यांचा एक व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल (Neena Gupta Viral Video) होत आहे.
कपिल शर्मा शोमध्ये नीना गुप्ता यांची हजेरी
नीना गुप्ता यांनी कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली होती, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. यावेळी कपिल शर्मानं त्यांना हॉलिवूड सीरिज बेवॉचमधील पामेला अँडरसनबद्दल एक प्रश्न विचारला. त्यावर नीना गुप्ता यांनी जे उत्तर दिलं, ते ऐकून मात्र सर्वांना कान बंद करून घेतले. एवढंच नाहीतर नीना गुप्ता यांनी कपिल शर्माच्या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्टपणे दिलं.
View this post on Instagram
पामेला अँडरसनच्या भूमिकेत नीना गुप्ता?
कपिल शर्मानं यावेळी नीना गुप्ता यांना एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता की, अशा अफवा आहेत की, नुकतीच हॉलिवूडची जी बेवॉच सीरिज आली, त्यामध्ये तुम्हाला पामेला अँडरसनची भूमिका साकारायची आहे. यावर नीना गुप्ता यांनी एकही क्षण न जाऊ देता तात्काळ उत्तर दिलं, जे ऐकून त्यांच्यासोबत शोमध्ये आलेल्या इतर अभिनेत्रींनी कान बंद करुन घेतले. नीना गुप्ता म्हणाल्या की, 'माझी ब्रेस्ट एवढीही मोठी नाहीये...'
नीना गुप्ता यांनी उत्तर दिल्यानंतर लोकांना कान बंद केले
नीना गुप्ता यांचं उत्तर ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला. सगळे जोरजोरात हसायला लागले. अनेकांनी तर नीना गुप्ता यांचं उत्तर ऐकून स्वतःचे काम बंद केले. त्यानंतर कपिल शर्मानं नीना गुप्ता यांना तात्काळ आठवण करुन दिली की, हा फॅमिली शो आहे. त्यामुळे इथे तसले जोक चालत नाहीत. त्यावरही नीना गुप्ता यांनी कपिलची बोलती बंद केली. नीना गुप्ता म्हणाल्या की, "तुम्ही नॉनव्हेज प्रश्न विचारु नका, आम्ही तशी उत्तरं देणार नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























