Nayanthara, Vignesh Shivan : आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार नयनतारा-विग्नेशचा विवाह सोहळा; दिग्गज सेलिब्रिटी लावणार हजेरी
लग्न सोहळ्याला शाहरुख खान (Shah Rukh Khan), रजनीकांत (Rajinikanth) असे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.
![Nayanthara, Vignesh Shivan : आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार नयनतारा-विग्नेशचा विवाह सोहळा; दिग्गज सेलिब्रिटी लावणार हजेरी nayathara Vignesh Shivan wedding shah rukh khan to rajinikanth kamal haasan invited Nayanthara, Vignesh Shivan : आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार नयनतारा-विग्नेशचा विवाह सोहळा; दिग्गज सेलिब्रिटी लावणार हजेरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/c84ce5e9969a6dee16b76bfb90008cb0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nayanthara, Vignesh Shivan : अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांचा विवाह सोहळा 9 जून रोजी रिलीज होणार आहे. नयनतारा आणि विग्नेश यांचा लग्न सोहळा महाबलिपुरम येथे पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी नयनतारा आणि विग्नेश हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते. नयनतारा आणि विग्नेश यांचा विवाह सोहळा महाबलिपुरममधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार आहे. त्यांच्या लग्न सोहळ्याला शाहरुख खान (Shah Rukh Khan), रजनीकांत (Rajinikanth) असे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.
लग्नसोहळ्यासाठी महाबलिपुरममधील एका आलिशान रिसॉर्ट नयनतारा आणि विग्नेश यांनी बुक केलं आहे. या रिसॉर्टमध्ये 129 रुम आहेत. लग्नानंतर रिसेप्शनचे देखील आयोजन करण्यात आलं आहे. एका मुलाखतीमध्ये विग्नेश शिवननं सांगितलं होतं की तिरुपतीमध्ये आधी लग्न सोहळा पार पडणार होता. पण नंतर लग्न सोहळ्याचे लोकेशन बदलण्यात आलं आहे.
हे सेलिब्रिटी लग्न सोहळ्याला हजेरी लावणार
रजनीकांत, कमल हासन, शाहरुख खान,चिरंजीवी, सूर्या,विजय सेतुपती, समंथा रुथ प्रभु हे कलाकार हजेरी लावणार आहेत. नयनतारा ही शाहरुखसोबत जवान चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.
नयनतारा आणि विघ्नेश शिवन गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत गेल्या वर्षी नयतारा आणि विग्नेश यांचा गेल्या वर्षी साखरपुडा झाला. नयनतारानं 25 मार्च 2021 रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली. या फोटोमध्ये नयनतारा रिंग फ्लॉन्ट करताना दिसली. नानुम राउडी धन या चित्रपटासाठी नयनतारा आणि विग्नेश यांनी एकत्र काम केलं होतं. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या 'काथुवाकुला रेंदू कादल' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटाचे दिग्दर्शन विघ्नेशने केले होते. नयनतारा, विजय सेतुपती आणि समंथा रुथ प्रबू या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. तसेच विघ्नेशचा AK62 हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या
- TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Bhirkit : विनोदाच्या बादशाहांचा 'भिरकीट'; 17 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित
- Vikram Box Office Collection : विक्रमची जगभरात घोडदौड सुरू; पाच दिवसात 200 कोटींचा टप्पा पार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)