Nayantara Dhanush Controversy: नयनतारा धनुषच्या विवादात आता वडिलांची उडी, धनुषवर झालेल्या आरोपावर म्हणाले..
आता धनुषच्या वतीने त्याचे वडील कस्तुरी राजा यांनी नयनताराच्या खुल्या पत्राला आणि तिच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
Nayantara Dhanush Controversy: लेडी सुपरस्टार नयनतारा आणि तमिळ सुपरस्टार धनुष या दोघांमध्ये असणारी नाराजी नुकतीच लोकांसमोर आली. नयनतारा सध्या तिच्या डॉक्युमेंट्रीमुळे चर्चेत आहे. नयनताराच्या डॉक्युमेंट्रीवर साऊथ अभिनेता धनुषने 10 कोटींची कॉपीराईट केस केली आहे. नयनताराने नुकत्याच केलेल्या लांबलचक सोशल मीडिया पोस्ट करत धनुषवर जोरदार टीका केली होती. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर जनतेनेही नयनताराला पाठिंबा देत धनुषवर टीका करण्यास सुरुवात केली. आता धनुषच्या वतीने त्याचे वडील कस्तुरी राजा यांनी नयनताराच्या खुल्या पत्राला आणि तिच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
काय म्हणालें धनुषचे वडील?
कस्तुरी राजा यांनी धनुषवर नयनतारानं केलेले आराेप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. धनुष त्याच्या आगामी चित्रपटात व्यस्त असून या सर्व गोष्टींसाठी त्याच्याकडे वेळ नसल्याचेही त्याने सांगितले. धनुषचे वडील म्हणाले, 'आमच्यासाठी काम खूप महत्त्वाचे आहे. आम्ही पुढे जात आहोत. जे आपल्या मागे लागतात किंवा आपल्या मागे आपल्याबद्दल बोलतात त्यांच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. माझ्याप्रमाणे माझा मुलगाही फक्त कामावर लक्ष केंद्रित करतो. असं धनुषचे वडील म्हणाले.
नक्की वाद काय?
नयनतारा या साऊथच्या लेडी सुरस्टार नयनताराच्या आयुष्यावर बेतलेली डॉक्यूमेंन्ट्री नयनतारा : बियॉन्ड द फेयरीटेल शनिवारी प्रर्दशित झाली. या डॉक्यूमेंन्ट्रीत नयनताराच्या निर्मात्यांना धनुषच्या चित्रपटातलं नानूम राउडी धन च्या शुटिंगमधलं पडद्यामागचं शुटिंग वापरायचं होतं.खरंतर या चित्रपटाच्या सेटवर नयनताराचे दिग्दर्शक असणारा विघ्नेश शिवन याच्या प्रेमात पडून नयनतारानं लग्न केलं आहे. पण या सिनेमाचा निर्माता धनुष होता. त्यामुळे त्याची परवानगी घेणं आवश्यक होतं. नयनतारानं आरोप केला आहे की धनुषने फुटेज वापरण्याची परवानगी दिली नाही आणि फुटेज वापरल्याबद्दल तिला कायदेशीर नोटीस पाठवली आणि 10 कोटी रुपयांची मागणी केली. यावर तिनं पत्र लिहिलं होतं की, धनुषनं पाठवलेल्या नोटीशीतील ओळी वाचून आम्हाला आश्चर्य वाटलं जेंव्हा आम्ही व्हिडिओचे केवळ ३ सेकंद वापरले होते. हा व्हिडिओ आमच्या पर्सनल डिवाईसवरून शूट करण्यात आला होता. यात BTS चे काही विज्यूअल्स आहेत जे सोशल मीडिआवर लोकांकडेही उपलब्ध आहेत.अवघ्या 3 सेकंदाच्या त्या व्हिडिओसाठी तुम्ही 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. हा निचपणा आहे. असं तिनं म्हटलं होतं.