एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Tirsaat Marathi Movie : राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांतचं 'तिरसाट'मधून अभिनयात पदार्पण, जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Tirsaat Marathi Movie trailer : ‘तिरसाट’ (Tirsaat) या चित्रपटात नीरज प्रमुख भूमिकेत असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला.

Tirsaat Marathi Movie : राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेला सूर्यकांत पवार यांचा मुलगा आणि राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांत (Neeraj Suryakant) आता अभिनयात पदार्पण करत आहे. 20 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘तिरसाट’ (Tirsaat) या चित्रपटात नीरज प्रमुख भूमिकेत असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्मसने  ‘तिरसाट’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अॅड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

अभिनेता नीरज सूर्यकांत आणि अभिनेत्री तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड ‘तिरसाट’ या चित्रपटात उलगडण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं ‘उधाण आलंया, फ़र्मान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,' असे शब्द असलेलं गाणं आणि टीजर  लाँच करण्यात आलं होता. या गाण्याला आणि टीजरला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्यानं चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

वडिलांकडून मिळाला खेळाचा वारसा!

वडिलांकडून मिळालेला खेळाचा वारसा पुढे चालवत नीरजनं सायकलिंग या खेळात नैपुण्य मिळवलं. जिल्हास्तरापासून सुरुवात करत राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. मात्र, खासगी कारणास्तव सायकलिंग बाजूला पडलं. एका चित्रपटाच्या निमित्ताने राज डावखरे, जय सुरवसे आणि सुरज टक्के या मित्रांमुळे नीरजची भेट दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांच्याशी झाली. त्यानंतर नाटक आणि एकूणच मनोरंजन क्षेत्रातला नीरजचा प्रवास सुरू झाला. ‘वऱ्हाड आलंय लंडनहून’सारखं नाटक, ‘चांडाळचौकडी’सारखी वेब सिरीज आणि शॉर्टफिम्स करत आता नीरज ‘तिरसाट’ या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

या चित्रपटात यतीन कार्येकर, ओंकार यादव, पल्लवी घुले, सुजीत चौरे, विवेक यादव, आनंद साने, रामदेव जमदाडे, नीलिमा कामने, श्रुती उबाळे यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. मुराद तांबोळी, मनिषा भोसले, निलेश कटके यांनी लिहिलेल्या गीतांना पी.शंकर यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, गायिका मुग्धा कऱ्हाडे आणि पी. शंकर यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : ईव्हीएमसंदर्भात संजय राऊतांकडून शंका व्यक्त; म्हणाले आमच्याकडे  450 तक्रारीAjit Pawar Full PC : टायमिंग जुळलं नाही; शरद पवारांचेही आशीर्वाद घेतले असते - अजित पवारRohit Pawar on Ajit Pawar Meeting : अजित दादांचं 'ते' वक्तव्य; रोहित पवारांची कबुलीTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Embed widget