दोन महिन्यात 12 शो रद्द! कॉमेडियन मुनव्वर फारुकी म्हणाला, कलाकार हरला, अलविदा...!
गेल्या दोन महिन्यात लोकांनी दिलेल्या धमक्यांमुळे मुनव्वर फारूकीचे 12 शो रद्द झाले आहेत.
Munawar Faruqui : प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारूकीच्या (Munawar Faruqui) कॉमेडी शोला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. पण गेल्या दोन महिन्यात लोकांनी दिलेल्या धमक्यांमुळे त्याचे 12 शो रद्द झाले आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याच्या आरोपांमुळे मुनव्वरला अटक करण्यात आली होती. तो एक महिना अटकेत होता. मुनव्वरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
मुनव्वरचा 28 नोव्हेंबर रोजी बंगळूरू येथे कॉमेडी शो होणार होता पण तो रद्द झाला. त्यामुळे मुनव्वरने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टला त्याने कॅप्शन दिले, 'द्वेष करणाऱ्यांचा विजय झाला. कलाकार हरला. अलविदा.' त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करून त्याला शो सुरू ठेवण्यास सांगितलं आहे. या पोस्टवर म्यूजीशियन मयूर जुमानीने कमेंट केली, 'तु शो करणं बंद करू शकत नाही, आम्ही तुला असं करू देणार नाही. '
एका रिपोर्टनुसार, पोलीसांनी शोच्या आयोजकांना लिहिलेल्या पत्रात मुनव्वर फारुकीच्या 'डोंगरी टू नोव्हेअर' या शोचा संदर्भ देऊन सांगितले की मुनव्वर हा एक विवादित व्यक्ती आहे. बंगळुरू येथील हिंदू जागरण समितीच्या प्रतिनिधीनेही हा शो होऊ देणार नसल्याचे सांगितले.
View this post on Instagram
Disha Patani : दिशा पाटनीनं केली प्लास्टिक सर्जरी? व्हिडीओ पाहून चाहते अवाक्
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मुनव्वरने सांगितले की, त्याच्या बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या शोची 600 तिकीटे विकली गेली होती. तसेच त्याने लिहीले, 'धमक्यांमुळे बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेला शो रद्द करण्यात आला आहे. आमच्याकडे शोचे सेन्सोर सर्टिफिकीट देखील होते.'
Bigg Boss Marathi 3 : अच्छा तो हम चलते है! गोल्डमॅन दादूसने घेतला 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप