देवाचं घर म्हणजे काय? उत्तर मिळणार 31 जानेवारीला; 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटाचा टीजर लॉन्च!
Mukkam Post Devach Ghar Marathi Film: आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवालाही पत्र पोहोचेल अशा अनोख्या कल्पनेतून सुरू होणाऱ्या टीजरमुळे 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' मनाला भिडणारी गोष्ट नक्कीच सांगणार असल्याचा अंदाज देतो.
Mukkam Post Devach Ghar Marathi Film: देवाचं घर म्हणजे काय? ते नक्की कुठे असतं? या एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' (Mukkam Post Devach Ghar) या चित्रपटातून मिळणार आहे. या चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीजर नुकताच लाँच करण्यात आला असून, हा चित्रपट 31 जानेवारी रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवालाही पत्र पोहोचेल अशा अनोख्या कल्पनेतून सुरू होणाऱ्या टीजरमुळे 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' मनाला भिडणारी गोष्ट नक्कीच सांगणार असल्याचा अंदाज देतो. एका लहान मुलीला पडलेल्या प्रश्नाचं काय उत्तर असेल? याचा शोध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. तसेच, दरम्यान तिच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींची जोडही देण्यात आली आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीनं ही गोष्ट उलगडणार असून सहकुटुंब हा चित्रपट पाहता येणार आहे. त्यामुळे 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' हा चित्रपट येत्या 31 जानेवारीपासून चित्रपटगृहात जाऊनच पाहायला हवा यात शंका नाही.
मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांची असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.
मायरा वायकुळचा अवखळ अंदाज सविता मालपेकर आणि उषा नाडकर्णी यांची खमंग फोडणी त्याला प्रथमेश परब, मंगेश देसाई, कल्याणी मुळे, रेशम श्रीवर्धन यांची भक्कम साथ असल्यामुळे सहकुटुंब प्रेक्षकांना नक्कीच मेजवानी मिळणार आहे.
मायरा वायकुळ कोण?
सोशल मीडियावर मायराच्या खूप चर्चा रंगलेल्या असतात. नुकताच मायराच्या लहान भावाचा राजेशाही थाटात नामकरण सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. मायराच्या युट्यूब चॅनलवर तिचा लहान भाऊ व्योम याच्या नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. मायरानं 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं.
पाहा टीझर :
महत्त्वाच्या इतर बातम्या :