Blockbuster Celebrity Actress: बॉक्स ऑफिसची क्वीन आहे, एकमेव भारतीय अभिनेत्री; केलीय 10,000 कोटींची कमाई, अल्लू अर्जुनतर जवळपासही नाही
Bollywood Blockbuster Celebrity Actress: गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा 2 बॉक्स ऑफिस गाजवतोय, पण या अभिनेत्रीसमोर तोदेखील पाणी कम चाय आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
Bollywood Blockbuster Celebrity Actress: बॉलिवूडमधल्या (Bollywood) सुपरडुपर कमाई करणाऱ्या अभिनेत्यांबाबत तुम्ही ऐकलं असेलच. पण, बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री (Bollywood Celebrity) आहे, जिनं कमाईच्या बाबत भल्या भल्या अभिनेत्यांनाही मागे टाकलं आहे. जिनं कमाईच्या बाबतीत मोठ्या दिग्गजांनाही पराभूत केलं आहे. सलमान (Salman Khan), आमिर (Aamir Khan) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) या बॉलिवूडच्या तीन खान्सलाही तिनं अगदी सहज मागे टाकलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा 2 बॉक्स ऑफिस गाजवतोय, पण या अभिनेत्रीसमोर तोदेखील पाणी कम चाय आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भल्या भल्या दिग्गज स्टार्सना पछाडणाऱ्या अन् एकापेक्षा एक असे हिट चित्रपट देणाऱ्या बॉक्स ऑफिस क्वीनला तुम्ही ओळखता का?
भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री, बॉक्स ऑफिसवर कोणी आसपासही नाही...
एखादा सिनेमा हिट झाला की, नाही, हे कशावरुन समजतं, तर बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवरुन. मग त्याची कथा कितीही चांगली असो किंवा गाणी धमाकेदार असो, तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती चालतोय, किती रुपयांची कमाई करतोय यावरच तो चित्रपट यशस्वी ठरला की, नाही हे ठरतं. एखाद्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा चित्रपट किती चालणार? यावरुन त्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची किंमत ठरते. त्याच मेट्रिकनुसार, खान हे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात यशस्वी सेलिब्रिटी आहेत. पण, या तिघांनाही पछाडणारी एक सौंदर्यवती आहे, जिनं बॉक्स ऑफिसवर थोडे थोडके नाहीतर तब्बल 10 हजार कोटी कमावले आहेत.
शाहरुख, सलमान आणि आमिर खाननं त्यांच्या करिअरमध्ये बॉक्स ऑफिसवर 7000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आणि तरीही, 10,000 कोटींचा टप्पा मोडण्यात यशस्वी झालेल्या अभिनेत्रीला ते पछाडू शकले नाहीत. भल्या भल्या दिग्गजांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर राज्य करणारी दिग्गज अभिनेत्री म्हणजे, बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण. गेल्या दशकात, ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. अनेक भाषांमध्ये हिट चित्रपट देऊन या अभिनेत्रीनं सर्वात मोठ्या स्टार्समध्ये आपलं स्थान पक्कं केलं.
View this post on Instagram
स्वतःच्या हिमतीवर हिट चित्रपट दिला
18 वर्षांच्या कारकिर्दीत, दीपिकाच्या चित्रपटांनी जागतिक बॉक्स ऑफिसवर एकत्रितपणे 10,200 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये तिच्या भारतीय चित्रपटांमधून 8000 कोटी आणि तिचा एकमेव हॉलिवूडपट XXX मधील 2200 कोटी कलेक्शनचा समावेश आहे. दीपिकाचे अनेक हिट चित्रपट बड्या स्टार्ससोबत आहेत, पण तिनं स्वत:च्या हिमतीवर 'पद्मावत'सारखा हिट चित्रपट दिला आहे.
दोन वर्षांत सगळा खेळ बदलला
विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वीपर्यंत दीपिका भारतातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री नव्हती. ती टॉप 5 मध्येही नव्हती. 2023 आणि 2024 मध्ये काही मेगा रिलीजनंतर आज ती सिनेइंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री बनली आहे.
'या' चार चित्रपटांनी विक्रम रचले
या दोन वर्षांत दीपिका पाच चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्यापैकी पठाण, जवान आणि कल्की या तिघांनी 1000 कोटींहून अधिक कमाई केली. फायटर आणि सिंघम अगेन या उर्वरित दोन चित्रपटांनीही 300 कोटींहून अधिक कमाई केली. अशा प्रकारे, दीपिका या दोन वर्षात तिच्या बॉक्स ऑफिस कमाईत 4000 कोटींहून अधिकची भर घालण्यात यशस्वी ठरली.
कतरिना, प्रियांकाही खूप मागे
दीपिकाला बॉक्स ऑफिसची क्विन म्हणू शकता. दीपिका भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. तर, बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (6000 कोटी) आणि कतरिना कैफ (5500 कोटी) यांनाही दीपिकानं मागे टाकलं आहे.
सलमान, शाहरुख आणि आमिरही मागे
फक्त अभिनेत्रीच नाही, तर अभिनेत्यांनाही दीपिकानं मागे टाकलं आहे, शाहरुख खान (9000 कोटी), अक्षय कुमार (8300 कोटी), सलमान खान (7500 कोटी), आणि आमिर खान (7200 कोटी) हे सर्व दीपिकाच्या मागे आहेत.
दोन मोठे चित्रपट
दीपिकाकडे सध्या कल्की 2 आणि ब्रह्मास्त्र 2 हे प्रोजेक्ट्स आहेत. शंभर कोटी कमावण्याची क्षमता असलेले हे दोन मेगा चित्रपट आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :