Alia Bhatt Company : आलिया भट्टची कंपनी खरेदी करणार मुकेश अंबानी, 350 कोटींची डील
Alia Bhatt Company : 300 ते 350 कोटी रुपयांमध्ये मुकेश अंबानी आलिया भट्ट हिची कंपनी खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे.
Alia Bhatt Ambani Deal : आलिया भट्ट हिने फक्त अभिनय आणि मॉडलिंगमध्येच नव्हे तर व्यावसायातही यश संपादन केलेय. आलिया भट्ट हिची कंपनी लहान मुलाचे कपडे तयार करते. रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट हिची कंपनी मुकेश अंबानीची रिलायन्स कंपनी खरेदी करण्याच्या तयारीमध्ये आहे. याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. 300 ते 350 कोटी रुपयांमध्ये मुकेश अंबानी आलिया भट्ट हिची कंपनी खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे.
आलिया भट्टची कंपनी एटर्नलिया क्रिएटिव्ह Ed-a-Mamma ब्रँड लहान मुलांचे कपडे तयार करते. रिलायन्स ब्रँड्स आलियाच्या या कंपनीला खरेदी करुन चिल्ड्रन वेअर कॅटेगरीला आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे. याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, Ed-a-Mamma या कंपनीला मुकेश अंबानी 300 ते 350 कोटी रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. इकोनॉमिक टाइम्सने याबाबतचे वृत्त दिलेय. व्यावसायाचा विस्तार करण्यासाठी रिलायन्स कंपनीने आलिया भट्ट हिची कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रिलायन्स आणि इटर्निया क्रिएटिव्ह अँड मर्चेंडायझिंग, एड-ए-मम्माच्या मागे असलेल्या युनिटकडून कोणतेही विधान आलेले नाही.
लहान मुलाचे कपडे तयार करणारी Ed-a-Mamma याचे सर्व राईट्स एटर्नलिया क्रिएटिव यांच्याकडे आहे. आलिया भट्ट या कंपनीची क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आलिया भट्टची कंपनी आणि रिलायन्स ब्रँड्स यांच्यामध्ये सुरु असलेल्या चर्चेला पुढील आठवड्यात अंतिम स्वरुप मिळू शकते. दरम्यान, आलिया भट्टने Ed-a-Mamma या ब्रँडची सुरुवात 2020 मध्ये केली होती. या ब्रँडअंतर्गत वेगवेगळ्या ऑनलाईन फ्लॅटफॉर्मद्वारे कपड्याची विक्री केली जाते. आलिया भट्टची कंपनी नफ्यात आहे.
Ed-a-Mamma ब्रँडला सुरु करताना आलिया म्हणाली होती की, जागतिक स्तरावर घरगुती ब्रँडची कमतरता पाहून कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. माफक दरामध्ये मुलांची कपडे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असेल. Ed-a-Mamma ब्रँडचे कपडे विविध संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. फर्स्टक्राई, Ajio, Myntra, Amazon, Tata CLIQ यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे कपडे उपलब्ध आहेत. आलिया भट्ट हिच्या Ed-a-Mamma या कपनीची सध्या मार्केट व्हॅल्यू 150 कोटी रुपये आहे. ही कंपनी विकत घेऊन व्यावसायाचा विस्तार करण्याचा प्रयत्न रिलायन्स कंपनीचा असेल. त्यामुळे रिलायन्सने आलिया भट्ट हिची कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा :