एक्स्प्लोर

World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ, फ्लाईट्स तिकिटात 300 टक्क्यांनी वाढ, मुंबई-अहमदाबादचे तिकिट 22 हजार रुपये

IND vs PAK, World Cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला तीन महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय.

IND vs PAK, World Cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला तीन महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय. 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये दहा संघामध्ये विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागलेय. 15 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर लढत होणार आहे. या सामन्यासाठी क्रीडा चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. हॉटेल्स, तिकिट आणि इतर अनेक गोष्टींच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आलेय. 14 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर यादरम्यान अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइट्सच्या किंमतीमध्ये तब्बल 300 टक्के इतकी वाढ झाली आहे. 

फ्लाइट्स तिकिटामध्ये 300 टक्केंची वाढ -

तुम्ही 14 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर यादरम्यान फ्लाइट्सने अहमदाबादला जायचा विचार करत असाल तर तुम्हला 300 टक्के अधीक पैसे खर्च करावे लागतील. या तारखेला मुंबई ते अहमदाबाद जाणाऱ्या फ्लाईट्सचे तिकिट 22 हजार रुपये इतके करण्यात आलेय. दिल्लीवरुन अहमदाबादला जायचे असेल तर तिकिटाची किंमत 21 हजार रुपये इतकी आहे. 14 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर यादरम्यान कोलकाता ते अहमदाबादसाठी फ्लाइट्स तिकिट 42 हजार रुपये इतके झालेय. तर बेंगलोरवरुन जायचे असल्यास फ्लाइट्स तिकिट 18 हजार रुपये इतके आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यामुळे फ्लाइट्सच्या तिकिटामध्ये तब्बल 300 टक्केंनी वाढ झाली आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी क्रीडा चाहत्यामध्ये उत्सुकता -

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला दोन ते तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. पण फ्लाइट् तिकिटाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. हैदराबाद ते अहदाबाद या फ्लाइट्सच्या तिकिटाची किंमत 35 हजार रुपये इतकी आहे. तर चेन्नईवरुन अहमदाबादला जाणाऱ्या 45 हजार रुपये मोजावे लागणार आहे. 14 ते 16 ऑक्टोबरदरम्यान चंदीगढ ते अहमदाबाद फ्लाईट्स तिकिट 24 हजार रुपये मोजावे लागतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 15 ऑक्टोबरला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये फक्त आयसीसीच्या स्पर्धेमध्येच लढत होते. त्यामुळे या लढतीकडे जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष असते. क्रीडा चाहते आतुरतेने या सामन्याकडे पाहताता. भारतात होणाऱ्या विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना होणार आहे. 

आणखी वाचा :

Pakistan Cricket Team : पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर कोण, बाबर आझम, शाहीन आफ्रिदी की शोएब अख्तर?

Team Inda : विश्वचषकाआधी टीम इंडियासाठी खूशखबर, 4 महत्वाचे खेळाडू दुखापतीतून सावरले, लवकरच करणार कमबॅक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aniruddhacharya on Abrar Ahmed : अबरार अहमदला संघात घेताच अनिरुद्धाचार्य संतापले, म्हणाले, काव्या मारनने दिलेल्या पैशांनी....
अबरार अहमदला संघात घेताच अनिरुद्धाचार्य संतापले, म्हणाले, काव्या मारनने दिलेल्या पैशांनी....
Pak vs Ban ODI : गोळी मारून टाका त्या माणसाला…; पाकिस्तानी दिग्गजाचा संताप अनावर; वक्तव्याने क्रिकेटविश्व हादरलं
गोळी मारून टाका त्या माणसाला…; पाकिस्तानी दिग्गजाचा संताप अनावर; वक्तव्याने क्रिकेटविश्व हादरलं
लिलावात पाकिस्तानच्या खेळाडूला खरेदी केलं, काव्या मारन अडचणीत; BCCI ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आयपीएलसाठी...
लिलावात पाकिस्तानच्या खेळाडूला खरेदी केलं, काव्या मारन अडचणीत; BCCI ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आयपीएलसाठी...
Match Fixing News : टी-20 वर्ल्ड कप संपताच क्रिकेटमध्ये भूकंप! मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी खळबळ; 3 खेळाडूंवर ICCची थेट मोठी कारवाई
टी-20 वर्ल्ड कप संपताच क्रिकेटमध्ये भूकंप! मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी खळबळ; 3 खेळाडूंवर ICCची थेट मोठी कारवाई

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Share Market Crash : शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स पाच दिवसात 4350 अंकांनी कोसळला,गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 20 लाख कोटी बुडाले
अमेरिका- इराण युद्ध, तेलाच्या वाढलेल्या दरानं शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 दिवसात 20 लाख कोटी बुडाले
Multibagger Stock: 11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
Embed widget