(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MTV Video Music Awards 2022: ‘एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक अवॉर्ड्स 2022’ची नामांकनं जाहीर! केंड्रिक लॅमर ते BTS बँडच्या नावाचा समावेश!
MTV Video Music Awards 2022: ‘एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक अवॉर्ड्स 2022’ची (MTV Video Music Awards 2022) नामांकनं जाहीर नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत.
MTV Video Music Awards 2022: ‘एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक अवॉर्ड्स 2022’ची (MTV Video Music Awards 2022) नामांकनं जाहीर नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात आपली वर्णी लागावी म्हणून अनेक गायक (Singer) आणि कलाकार प्रचंड मेहनत करत असतात. यंदाच्या या पुरस्कारांच्या नामांकनामध्ये केंड्रिक लॅमर (Kendrick Lamar), रॅपर जॅक हार्लो (Jack Harlow) आणि Lil Nas X यांनी बाजी मारली आहे. त्यांना एक-दोन नव्हे तर तब्बल सात विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे. याशिवाय या पुरस्कार सोहळ्यात इतर विभागांमध्ये अनेक बड्या नावांचा समवेश आहे. येत्या 28 ऑगस्टला न्यू जर्सीमध्ये ‘एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक अवॉर्ड्स 2022’च्या विजेत्यांची नावे घोषित करण्यात येणार आहेत.
पॉप स्टार डोजा कॅट (Doja Cat) आणि हॅरी स्टाइल्स (Harry Styles) यांना प्रत्येकी सहा नामांकनं मिळाली आहेत. बिली इलिश, ड्रेक, दुआ लिपा, एडी शीरन, टेलर स्विफ्ट आणि द वीकेंड यांना प्रत्येकी पाच नामांकनं प्राप्त झाली आहेत. या व्यतिरिक्त, मॅडोनला देखील तिच्या ‘मॅडम एक्स’साठी नामांकन मिळाले आहे.
या पुरस्कार सोहळ्यात जगप्रसिद्ध म्युझिक बँड BTSला देखील चार विभागांमध्ये नामांकन मिळाले आहे. ‘एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक अवॉर्ड्स 2022’च्या नामांकन यादीत BTS, Seventeen, Twice, Blackpink, Lisa, Stray Kids आणि Itzy यांच्या नावाचा देखील समावेश आहे. ‘बेस्ट के पॉप येट टू कम’ या श्रेणीत देखील BTSला नामांकन मिळाले आहे. बीटीएस गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्कारांत बाजी मारत आहे. याशिवाय, सेप्टेटला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन 'परमिशन टू डान्स', सर्वोत्कृष्ट मेटाव्हर्स परफॉर्मन्स (माइनक्राफ्ट) आणि सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी नामांकन मिळाले आहे.
व्हिडीओ ऑफ द इयर विभागाची नामांकने
डोजा कॅट (Doja Cat) : वूमन (Woman)
ड्रेक (Drake) आणि यंग थग (Young Thug) : फ्युचर (Future)
एडी शीरन (Ed Sheeran) : शीवर्स (Shivers)
हॅरी स्टाईल्स (Harry Styles)
लिटील नॅस एक्स (Lil Nas X) आणि जॅक हार्लो (Jack Harlow)
ऑलीव्हिया रोड्रीगो (Olivia Rodrigo)
टेलर स्विफ्ट (Taylor Swift)
आर्टिस्ट ऑफ द इयर
बॅड बनी (Bad Bunny)
ड्रेक (Drake)
एडी शीरन (Ed Sheeran)
हॅरी स्टाईल्स (Harry Styles)
जॅक हार्लो (Jack Harlow)
लिटील नॅस एक्स (Lil Nas X)
लिझो (Lizzo)
साँग ऑफ द इयर
एडल (Adele) : Easy on Me
बिली इलिश (Billie Eilish) : Happier Than Ever
डोजा कॅट (Doja Cat) : Woman
एल्टन जॉन आणि दुआ लिपा (Elton John and Dua Lipa) : Cold Heart (PNAU Remix)
लिझो (Lizzo) : About Damn Time
द किड लेरॉय आणि जस्टीन बीबर : The Kid Laroi and Justin Bieber- Stay
हेही वाचा :