'मला महेश सरांकडून चित्रपटासाठी ऑफर...' अमित ठाकरेंचा खुलासा; 'या' चित्रपटात करणार होते कास्ट
Mahesh Manjrekar Offered Amit Thackeray a Movie Role: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे चर्चेत. मुलाखतीत फिल्मलाइन आणि स्पोर्ट्सबाबत मोठा खुलासा.

Mahesh Manjrekar Offered Amit Thackeray a Movie Role: संपूर्ण राज्यात सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र आले. दोघांनी मराठी अस्मितेसाठी एकत्र आले असल्याचे जाहीर केले. दरम्यान, ठाकरे बंधुंसह त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा मैदानात उतरले असल्याचं चित्र दिसतंय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे अनेक माध्यमांना भेट देत मुलाखती देताना दिसत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अमित ठाकरेंनी वेगळाच खुलासा केला आहे. त्यांना महेश मांजरे यांच्याकडून चित्रपटासाठी ऑफर आली असल्याची माहिती समोर आली आहे. अमित ठाकरेंनी केलेल्या खुलाशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमित ठाकरेंनी मुलाखतीत, 'तुम्ही राजकारणात नसता तर, तुम्ही कुठे असता?', असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर अमित ठाकरेंनी उत्तर दिलं. म्हणाले, "मला फिल्मलाइनमध्ये काहीतरी नवीन करायचं होतं. कॅमेराच्या मागे म्हणजेच दिग्दर्शन वगैरे असं काहीतरी. मला या गोष्टीची खूप आवड आहे. किंवा स्पोर्ट्समध्ये काहीतरी करायचं होतं. फुटबॉलमध्ये काहीतरी करायचं होतं. पण त्यावेळी फुटबॉलमध्ये एवढा काही स्कोप नव्हता. परंतु, फुटबॉलमध्ये तरूणांना खूप स्कोप आहे. फिल्मलाइनचा विचार केला होता पण तो खूप कमी कालावधीसाठी केला होता. कारण, 2014 नंतर माझी राजकारणात येण्याची इच्छा झाली", असं अमित ठाकरे म्हणाले.
'स्पोर्ट्समध्ये असे काही खेळ आहेत, जिथे प्रामुख्याने लक्ष द्यायले हवे. बॅडमिंटन असो किंवा इतर खेळ. बाकी खेळांकडे दुर्लक्ष केलं जातं', असं अमित ठाकरे म्हणाले. महेश मांजरेकरच्या सिनेमाबद्दल बोलताना अमित ठाकरे म्हणाले, "मला महेश मांजरेकर सरांकडून ऑफर आली होती. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटासाठी ऑफर आली होती. परंतु, राजकारण पूर्णवेळ करण्याचं काम आहे", असंही अमित ठाकरे म्हणाले.
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट 2025 रोजी प्रदर्शित झाला. महेश मांजरेकर यांनी साकारलेल्या या चित्रपटात प्रमुख कलाकारांची प्रमुख भूमिका होती. अभिनेता सिद्धार्थ बोडके यानं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत सयाजी शिंदे, त्रिसा ठोसर, मंगेश देसाई, शशांक शेंडे आणि सांची भोयर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
























