Marathi Actress : We Deserve Better! अभिनेत्रीला नाही बजावता आला मतदानाचा हक्क, पण तरीही महाराष्ट्राला आवाहन करत म्हणाली...
Marathi Actress : अभिनेत्री मिथिला पालकरला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. पण तरीही तिने मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
Marathi Actress : राज्यभरात विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मतदानाची प्रक्रिया पार पडली. अनेक नागरिकांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. पण अनेकांना त्यांचा हा मूलभूत हक्क बजावता आला नाही. याचसंदर्भात मराठी अभिनेत्रीने पोस्ट करत भाष्य केलं आहे. अभिनेत्री मिथिला पालकरला (Mithila Palkar) तिचा मतदानाच हक्क बजावता आला नाही. पण मिथिलाने नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
मिथिलाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात भाष्य केलं आहे. मिथिलाने पोस्ट करत म्हटलं की, मला यावेळी मतदान करता येणार नाही. पण महाराष्ट्र तुम्ही हे दाखवू शकता. हे आपल्यासाठी करा.. कारण We Deserve Better!
कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता श्रेयस तळपदे, शशांक केतकर, सयाजी शिंदे,आदेश बांदेकर यांसह अनेकांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. अभिनेता शशांक केतकरने तर त्याचा मतदान केल्याचा फोटो शेअर करत भारतीय जनतेचा जाहीनामाच सांगितला आहे. तसेच अभिनेता श्रेयस तळपदे यानेही एबीपी मझासोबत संवाद साधताना मतदारांच्या मताचा आदर ठेवावा असं आवहन राजकीय नेत्यांना केलं आहे.
तर निवडणुकीला काहीच अर्थ उरणार नाही... - श्रेयस तळपदे
अभिनेता श्रेयस तळपदेने एबीपी माझासोबत संवाद साधताना म्हटलं की, काहीही झालं तरी लोकांनी येऊन मतदान नक्की करावं. कारण हे असं सगळं होतं, मग मतदान नकोच करायला, ह्यामध्ये नको पडूयात आपण.. मला वाटतं की, आपला हक्का आहे हा, तो आपण बजावायलाच हवा.. सगळ्यांची आता अपेक्षा आहे, जे काही मागच्या काही वर्षात झालं ते पुन्हा घडू नये.. कारण असं जर घडायला लागलं,तर मग या मतदानाच्या प्रक्रियेचा, निवडणुकीला काहीच अर्थ उरणार नाही. आपली फसवणूक झाल्याची भावना मनात होते. त्यामुळे पुन्हा असं घडू नये इतकीच किमान अपेक्षा आहे.. राजकीय पक्ष जी काही आश्वासनं देतात, ती तुम्ही पूर्ण करा..आम्हीच काहीच सांगत नाही तुम्हाला.. तुम्हीच अजेंडा घेऊन येता आम्ही असं करु तसं करु.. मग तुम्ही ते पूर्ण करा.. या संपूर्ण प्रक्रियेचा आदर करुन, जर ह्याप्रमाणे गोष्टी होत नसतील, जो कौल आम्ही दिलाय, तसं होत नसेल तर लोकांकडे दुसरा मार्गही आहे.