एक्स्प्लोर

Ghoda Trailer : कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट सांगणारा 'घोडा'; ट्रेलर आऊट

Ghoda : कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट 'घोडा' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे.

Ghoda Marathi Movie : 'घोडा' (Ghoda) या सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. कुटुंबियांच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची गोष्ट 'घोडा' या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. 

17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'घोडा'

मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, अहोरात्र मेहनत करून धडपडणाऱ्या वडिलांची, वडील-मुलाच्या नात्याची विलक्षण गोष्ट 'घोडा' या मराठी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेक महोत्सवांमध्ये कौतुक झालेला हा सिनेमा 17 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

तगडी स्टारकास्ट असलेला घोडा

'घोडा' या सिनेमात कैलास वाघमारे, अर्चना महादेव, दिलीप धनावडे, राहुल बेलापुरकर, शिवराज नाळे, देवेंद्र देव, प्रफुल्ल कांबळे, वज्र पवार मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा टी. महेश यांनी सांभाळली आहे. तर जमीर अत्तार यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे. 

'घोडा' या सिनेमाची कथा काय आहे? (Ghoda Movie Story)

बांधकाम मजुराचा मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलासाठी आणलेला घोडा पाहून तसाच घोडा आणण्याची मागणी करतो. पण आर्थिक परिस्थिती बिकट असलेले त्याचे वडील आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करू शकतात का ? परिवाराच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची अनोखी कहाणी 'घोडा' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीत आतापर्यंत अनेक बाप आणि मुलाच्या नातेसंबंधावर आधारित सिनेमे झाले असले तरी हा सिनेमा नक्कीच वेगळा आहे. कष्टकरी आणि भांडवलदारी वर्ग यांच्या लढ्यात फुलणारं एक गोड स्वप्न म्हणजे 'घोडा' हा सिनेमा आहे. 

हृदयस्पर्शी कथानक, कसदार लेखन, उत्तम कलाकार असलेला 'घोडा' हा सिनेमा तांत्रिकदृष्ट्याही तितकाच दमदार आहे. अनेक महोत्सवांमध्ये कौतुक झालेल्या 'घोडा' या सिनेमाचं कुतूहल चांगल्या ट्रेलरमुळे आता वाढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मनोरंजनासोबत एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोनानंतर सिनेरसिक पुन्हा एकदा सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहत आहेत. 'जग्गू आणि जुलिएट' आणि 'घर बंदूक बिर्याणी' या सिनेमांसोबत 'घोडा' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ट्रेलर पाहा : 

संबंधित बातम्या

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी जिंकण्याआधीच शिव ठाकरेचं नशीब चमकलं; आता झळकणार भाईजानच्या सिनेमात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
कोल्हापूर जिल्ह्यात 'या' मतदारसंघात लाडक्या बहिणींचे सर्वाधिक मतदान! वाढलेला टक्का कोणाला रडवणार?
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Embed widget