Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी जिंकण्याआधीच शिव ठाकरेचं नशीब चमकलं; आता झळकणार भाईजानच्या सिनेमात
Shiv Thakare : सलमान खानच्या (Salman Khan) आगामी सिनेमात शिव ठाकरे झळकणार असल्याचं समोर आलं आहे.
![Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी जिंकण्याआधीच शिव ठाकरेचं नशीब चमकलं; आता झळकणार भाईजानच्या सिनेमात Bigg Boss 16 Shiv Thakare in a Salman Khan upcoming movie Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी जिंकण्याआधीच शिव ठाकरेचं नशीब चमकलं; आता झळकणार भाईजानच्या सिनेमात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/06/438bf2a442aba42aa31ca1eba6859ae11675669320953254_original.webp?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shiv Thakare On Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) सध्या चर्चेत आहे. आता या लोकप्रिय कार्यक्रमाचा ग्रॅंड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या या कार्यक्रमात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरातील प्रत्येक स्पर्धक खूप मेहनत घेताना दिसतो आहे. अशातच 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी जिंकण्याआधीच शिव ठाकरेचं (Shiv Thakare) नशीब उजळलं आहे.
सलमानच्या सिनेमात झळकणार शिव ठाकरे!
'बिग बॉस' (Bigg Boss) फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. शिवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिव ठाकरे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी सिनेमात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. 'बिग बॉस 16'च्या नुकत्याच पार पडलेल्या एका भागात शिव ठाकरे आणि प्रियंका चाहर चौधरीने पती-पत्नी म्हणून एक नाटक केलं. या नाटकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. शिव ठाकरेचा अभिनय सलमानच्या पसंतीस उतरल्याने त्याने त्याला आगामी सिनेमासाठी विचारणा केल्याचे म्हटले जात आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
शिव ठाकरे होणार 'Bigg Boss 16'चा विजेता?
'बिग बॉस 16'च्या ग्रॅंड फिनालेत अर्चना गौतम, प्रियंका चौधरी, शालीन भनोट, निमृत कौर, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे या स्पर्धकांचा समावेश आहे. पण अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये यंदाच्या पर्वाचा शिव ठाकरे विजेता होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. शिव ठाकरेची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत आहेत.
सलमान खानचे आगामी सिनेमे (Salman Khan Upcoming Movies)
सलमान खानसाठी 2023 हे वर्ष खूपच खास आहे. भाईजानचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. येत्या वर्षात सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. 'बिग बॉस 13' फेम शहनाज गिलदेखील या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तसेच त्याचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सलमानने शाहरुखच्या 'पठाण' सिनेमातदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 16: बिग बॉस- 16 च्या ग्रँड फिनालेआधीच सुंबुल झाली आऊट; घराबाहेर गेल्यानंतर व्यक्त केल्या भावना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)