Ajit Pawar : सांस्कृतिक खातं अजित पवारांकडेच जावं,मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याआधीच मराठी कलाकारांची मागणी
Ajit Pawar : मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याआधीच सांस्कृतिक खातं अजित पवारांकडे जावं अशी मागणी मराठी कलाकारांनी केली आहे.
Ajit Pawar : विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly Elections Results 2024) निकाल आता समोर आले आहेत. त्याचप्रमाणे महायुतीच्या (Mahayuti) भरघोस विजयानंतर नव्या सरकारचा शपथविधी लवकरच पार पडणार आहे. पण त्याआधीच मराठी कलाकारांच्या मागणीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याआधीच सांस्कृतिक खातं अजित पवारांकडे (Ajit Pawar) जावं अशी मागणी मराठी कलाकारांनी (Marathi Celebrities) केली आहे. त्यासाठी अजित पवारांना एक पत्र देखील लिहिण्यात आलं आहेय
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चित्रपट सांस्कृतिक विभागाने राष्ट्रवादीला सांस्कृतिक खाते देण्याची मागणी केलीये. या संदर्भातलं एक पत्र देखील त्यांनी अजित पवारांना लिहिलं होतं. पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्याक्षांनी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी हे पत्र अजित पवारांना लिहिलं आहे. सध्याच्या या सरकारमध्ये सांस्कृतिक खातं हे भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांकडे आहे. पण त्यांच्या कामकाजावर राष्ट्रवादीने अनेकदा नाराजी देखील व्यक्त केल्याचं म्हटलं जात होतं. तसेच हे खातं अजित पवारांकडेच यावं यासाठी पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी अभिनेते प्रभाकर मोरे आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी ही मागणी पक्षाकडे लावून धरलीये.
प्रभाकर मोरे यांची प्रतिक्रिया समोर
प्रभाकर मोरे यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, मी प्रभाकर मोरे, राष्ट्रवादी सांस्कृतिक कोकण विभागाचा अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम करत आहोत. आम्ही राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाच्या वतीने आमचे आदरणीय नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांना मागणी केली आहे की, जेव्हा नवीन सत्ता स्थापन करु तेव्हा नवीन मंत्रिमंडळामध्ये सांस्कृतिक खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेण्यात यावं. कारण अजित पवारांच्या माध्यमातून मागील काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांची उत्तम कामं झालेली आहेत. त्यामुळे आम्हा सगळ्याच कलाकारांची अशी इच्छा आहे की, हे खातं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे यावं...