Javed Akhtar on Married Life: लग्न ही अत्यंत निरुपयोगी गोष्ट..., जावेद अख्तर यांच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
Javed Akhtar on Married Life: जावेद अख्तर यांनी लग्नसंस्थेवर केलेल्या वक्तव्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Javed Akhtar on Married Life: ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी नुकतच लग्नसंस्थेवर केलेल्या वक्तव्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबतच्या नात्यावरही यावेळी त्यांनी भाष्य केलं आहे. लग्नसंस्थेला फारसं महत्त्व मी देत नाही, असं वक्तव्य यावेळी जावेद अख्तर यांनी केलं आहे. लग्न ही अत्यंत निरुपयोगी गोष्ट असून मीच कसबंस लग्न केलंय, असंही यावेळी त्यांनी म्हटलं.
'शोले', 'दीवार', 'जंजीर' सारख्या चित्रपटांचं लेखन करणारे जावदे अख्तर (Javed Akhtar) हे हिंदी सिनेसृष्टीमधलं एक मोठं नाव आहे. दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांना एकापेक्षा एक सरस अशी गाणी दिलीत. त्यामुळे प्रेक्षकांसाठीही हे नाव फार आवडीचं झालं. पण सध्या सोशल मीडियावर जावेद अख्तर हे लग्नसंस्थेवर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेल आहेत.
जावेद अख्तर लग्नाबद्दल काय म्हणाले?
एका मुलाखतीत जावेद अख्तर यांना शबाना आझमी यांच्यासोबतच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आले.त्यावेळी त्यांनी म्हटलं की, आम्ही दोघं नवरा बायकोपेक्षा मित्र जास्त होतो. जेव्हा तुम्ही एकमेकांचे मित्र होता, तेव्हा ते नातं जास्त यशस्वी होतं, असं मला वाटतं. माझ्यासाठी लग्न ही संकल्पनाच खूप अप्रासंगिक आहे. एखाद्या नात्यामध्ये कोणत्याही दोन व्यक्ती या आनंदी असणं जास्त गरजेचं आहे.
जावेद अख्तर यांनी शबाना आझमी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. याआधी त्याचं लग्न हनी इराणी यांच्यासोबत झालं होतं. त्यामुळे शबाना आझमी यांच्यासोबतचं हे दुसरं लग्न आहे. जावेद आणि हनी यांना फरहान आणि झोया अख्तर ही दोन मुले आहेत. फरहान आणि झोया दोघेही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. झोया अख्तर एक दिग्दर्शक आहे आणि फरहान अख्तर अभिनेता-दिग्दर्शक आहे.
View this post on Instagram