Rashmi Desai On Pranit More Controversy: 'लाजा वाटल्या पाहिजेत ..प्रणित ना कलाकार ना कॉमेडियन.. 'प्रसिद्ध मराठी अभिनेत्री 370 बिर्याणीवर प्रचंड भडकली;म्हणाली ..
सोशल मीडियावरील युजर्स आणि अनेक सेलिब्रिटी प्रणित मोरेसह हिमांशू जांगडावर संताप व्यक्त करताना दिसताहेत.

Tv Actress Rashmi Desai On Pranit More Controversy: प्रणित मोरेच्या शोमध्ये '370 रुपयांच्या बिर्याणी' सध्या सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. प्रणित मोरेच्या शोमध्ये महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आणखी चिघळताना दिसतोय. सोशल मीडियावरील युजर्स आणि अनेक सेलिब्रिटी प्रणित मोरेसह हिमांशू जांगडावर संताप व्यक्त करताना दिसताहेत. मनोरंजन सृष्टीतून रीम शेख, कुशा कपिला आणि उर्फी जावेद यांच्यानंतर आता 'उतरन' फेम मराठमोळी अभिनेत्री रश्मी देसाईनेही प्रणित मोरेवर जोरदार टीका केली आहे. तसेच त्याला 'कलाकार' म्हणणाऱ्यांनाही तिने सुनावले आहे.
"प्रणित ना कलाकार आहे, ना कॉमेडियन"
रश्मी देसाईने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रणित मोरेच्या युट्यूब व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, "प्रफुल भाऊ, ही कॉमेडी नाही. ही फक्त साधी चर्चा आहे, ज्यामध्ये कोणताही आशय नाही. जेव्हा एखाद्याकडे कंटेंट नसतो आणि सर्जनशीलतेचा अभाव असतो, तेव्हा तो फक्त गप्पा मारू लागतो. प्रणित ना कलाकार आहे, ना कॉमेडियन."
रश्मीचा रोष इथेच थांबला नाही. कला क्षेत्राला लक्ष्य करणाऱ्यांनाही तिने प्रत्युत्तर दिले. ती म्हणाली, "कला क्षेत्राला विनाकारण ट्रोल केले जात आहे. हे खऱ्या कलाकारांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे. त्या मुलाची नोकरी गेली आहे. प्रणित मोरेचा शोदेखील बंद झाला पाहिजे. प्रणित मोरे आणि गुरुग्रामच्या त्या मुलगा, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत.' असं तिनं म्हटलं.

'इश्क का रंग सफेद' या लोकप्रिय मालिकेत तिने छोटेखानी भूमिका साकारत प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर रश्मी देसाई विविध रिअॅलिटी शोमधून अधिक चर्चेत राहिली. 'झलक दिखला जा', 'कॉमेडी सर्कस' आणि 'फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी' यांसारख्या कार्यक्रमांमध्ये तिने आपली वेगळी छाप पाडली. मालिकांमधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रश्मीने पुढे बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या तसेच सहाय्यक भूमिका साकारल्या.
नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
प्रणित मोरेच्या शोमध्ये 23 वर्षीय हिमांशू जांगडा हा त्याच्या एका डेटिंगच्या अनुभवाबद्दल बोलत होता. त्याने सांगितले की, तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता. त्या वेळी त्यांनी चिकन बिर्याणी खाल्ली होती आणि त्यासाठी त्याने 370 रुपये खर्च केले होते. यानंतर त्या मुलीने तिला घरी सोडण्याची विनंती केली. त्यावर हिमांशूने, "मी 370 रुपये खर्च केले आहेत, ते वसूल तर करणारच," असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर त्याने त्या मुलीसोबतच्या खासगी क्षणांविषयीही सार्वजनिकरित्या चर्चा केली. यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. वाद वाढल्यानंतर प्रणित मोरेने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे माफी मागितली. तसेच संबंधित व्हिडीओ हटविल्याचेही सांगितले. यानंतर त्याने आपले इन्स्टाग्राम अकाउंटही डिलीट केले.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग





















