एक्स्प्लोर

Hemangi Kavi : बेधडक हेमांगीवर कौतुकाचा वर्षाव, 'बाई, बुब्स आणि ब्रा' पोस्टच्या माध्यमातून मांडलं वास्तव

अभिनेत्री हेमांगी कवीची एक फेसबुक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळं ती गुगल ट्रेडिंगमध्ये आली आहे. ब्रा वापरण्यासंदर्भात तिनं एक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे.

मुंबई : मराठी अभिनेत्री हेमांगी कवीची एक फेसबुक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळं ती गुगल ट्रेडिंगमध्ये आली आहे. ब्रा वापरण्यासंदर्भात तिनं एक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. यानंतर या विषयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही 'लोग क्या कहेंगे' या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात, असं हेमांगीनं म्हटलंय. हेमांगी कवीनं म्हटलं आहे की, बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो! मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही! 

त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरड्या चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice! पण यानिमित्ताने सांगावसं वाटतं...ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा social media वर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या image चा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती struggle करायचाय हे लक्षात येतं, असं हेमांगीनं म्हटलं आहे. आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक, असा टोला तिनं लगावला आहे. 

तिनं म्हटलं आहे की, Tshirt मधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा for that matter कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव किती natural पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो? सवयीचा भाग म्हणूनच ना! मग हेच स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी! ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, ज्या comfortable आहेत त्यांनी ती जरूर घालावी, मिरवावी anything! Their choice! पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने का बघितलं जावं! किंवा हे का लादलं जावं? 

हेमांगी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, किती तरी मुली ब्रा घालून ही nipples दिसतात म्हणून काय काय उपद्व्याप करतात... 2 2 ब्रा घालतात, nipple area ला tissue paper लावतात, nipple pads वापरतात, चिकट पट्टी लावतात... बाप रे!...कशासाठी एवढं आणि का?किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही 'लोग क्या कहेंगे' या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात. कामावरून, बाहेरून आल्यावर ज्या पद्धतीने मुली ब्रा काढून मोकळा श्वास घेतात ते जर त्याच 'लोग क्या कहेंगे' लोकांनां दाखवलं ना तर मुलींची दयाच येईल हो!

हेमांगीनं लिहिलं आहे की, स्वतःच्या घरात असतानाही घरच्यांसमोर दिवसभर ती ब्रा घालून राहायचं आणि मग रात्री झोपेच्या वेळी 'काढण्याची मुभा' दिल्या सारखी काढून ठेवायची! त्यावेळी ही अंगावर ओढणी नाहीतर स्टोल असतोच! कश्यासाठी यार! 

बाहेरच्या लोकांचं सोडून देऊ पण घरातले स्वतःचे वडील, भाऊ यांच्यासमोर पण ती ब्रा घालून राहायचं? का? त्याच बापाने मुलीला लहानपणी पूर्ण नग्न अवस्थेत पाहिलेलं असतं ना? मोठ्या किंवा लहान भावानं पाहिलेलं असतं मग मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे अवयव वाढल्यावर, त्यांचे अवयव असे मनाविरुद्ध बांधून, झाकून, लपवून ठेवायची काय गरज? ते वाढलेले अवयव जर घरातल्या पुरुषांच्या मनावर परिणाम करत असतील तर तो prob त्या पुरुषांचा आहे, असं तिनं म्हटलं आहे. 

तिनं म्हटलं आहे की, आमच्या घरात आम्ही घरात असताना ना कधी माझ्या मोठ्या बहिणीने ब्रा घातली ना मी घालत! माझ्या घरात माझे बाबा, मोठा भाऊ, गावाला गेले तर सर्व चुलते, चुलत भाऊ थोडक्यात घरातल्या सर्व पुरुषांसमोर आम्ही without ब्रा वावरतो! आम्हांला असं पाहून ना त्यांचे कधी विचार बदलले ना नजर! ना माझ्या आई मार्फत आम्हांला हे सांगण्यात आलं कारण आमच्याशी असलेलं नातं 'त्यांच्या' डोक्यात पक्कं आहे! 

हेमांगीनं लिहिलं आहे की,आमची लग्न झाल्यावर ही काही बदललं नाही! बाहेर जाताना, लोकांसमोर किंवा जेव्हा कधी वाटेल तेव्हाच ब्रा वापरली, वापरतो! याचा माझ्या संस्कारांशी किंवा उगीचच पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करण्याचं फॅड वगैरे म्हणून अश्या कुठल्याच गोष्टींशी काही संबंध नाही! 

अरे किती ती बंधनं? किती ते 'लोक काय म्हणतील' चं ओझं व्हायचं? अबे जगू द्या रे मुलींना, मोकळा श्वास घेऊ द्या! खरंतर हे सर्वात आधी स्त्रियांनीच आपल्या मनावर बिंबवून घ्यायला हवं! स्वइच्छे ने Without ब्रा वावरणे , दिसणारे nipples बघण्याची सवय करून घ्यायली हवी आणि तेवढीच ती द्यायला ही हवी, असं हेमांगीनं लिहिलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget