एक्स्प्लोर

Sunil Tawade: 'नवरा माझा नवसाचा'फेम अभिनेत्याची मुलगी लग्नाआधीच सासरी राहायला गेली, मुलाखतीत कारण देत स्पष्टच म्हणाले..

Sunil tawade daughter Ankita tawade pre marriage story: सुनील तावडे यांची लेक लग्नाआधी सासरी राहायला गेली होती, यामागचं त्यांनी मुलाखतीत कारण सांगितलं.

Sunil Tawade Daughter Ankita Tawade: मराठमोळे कलाकार ज्यांनी आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, अभिनेते सुनील तावडे (Sunil Tawade) प्रोफेशनलसह वैयक्तिक कारणांमुळे अनेकदा चर्चेत असतात. सुनील तावडे यांनी आपल्या कारकि‍र्दीत  विविध चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.  त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. विनोदी असो किंवा गंभीर, प्रत्येक भूमिका ते उत्तमरित्या साकारतात. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय. दरम्यान,  सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकरही वडिलांसारखाच (Shubhankar tawade) अभिनय क्षेत्रात  कार्यरत आहे. तर, त्यांना एक मुलगी देखील आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सुनील तावडेंनी लेकीचाही उल्लेख केला. त्यांची मुलगी लग्नाआधी सासरी राहायला गेली होती. सासरी राहण्यामागचं कारण काय? याचा खुलासा सुनील यांनी आपल्या मुलाखतीतून केला.  यात सुनील यांनी लेकीनं घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं आहे. तसेच लेकीचं (Ankita Tawade) कौतुकही केलं आहे.

मला माझ्या जावयावर आणि लेकीवर विश्वास आहे (Sunil Tawade On Ankita Tawade)

माहितीनुसार, सुनील यांची मुलगी  अंकिता तावडे हिचं लग्न ठरलं. लग्नाआधी ती सासरी राहायला गेली होती. परंतु, ती सासरी राहायला का गेली होती?  याचा खुलासा सुनील यांनी आरपारला दिलेल्या मुलाखतीत केला. अंकिताचे वडील  सुनील तावडे यांनी मुलाखतीत सांगितलं की, 'मुलाची आई तेव्हा खूप आजारी होती. त्यामुळे माझी मुलगी त्यांच्याकडे जाऊन राहिली, लग्नाआधीच...त्याच्या आईने परवानगी दिली.  मी देखील तिला परवानगी दिली. ती काहीतरी चांगलं करायला चालली आहे ना.. मला माझ्या जावयावर विश्वास आहे आणि माझ्या मुलीवरही तितकाच विश्वास आहे', असं सुनील तावडे म्हणाले.

माझ्या लेकीनं लग्नाआधीच सासूची सेवा केली (Ankita Tawade Pre Marriage Story)

 

'माझ्या लेकीनं लग्नाआधीच सासूची सेवा केली. सासू पण माझ्या मुलीला मुलगी  मानू लागली.  माझी बायको देखील जावयाला मुलाप्रमाणे वागणूक द्यायला लागली. तिची सासू मला भाऊ मानायला लागली. यामुळे आम्ही सगळे एकमेकांना अटॅच झालो. हे सगळं का घडलं, कारण माझी लेक त्यांच्याकडे राहायला गेली. तसेच सासूची लग्नाआधीच सेवा करु लागली. तिने हे सगळं मनापासून केलं. असं नाही की, लग्न ठरलंय, तर सासूची आपण सेवा केली पाहिजे..असं नाही. तिने जे काही केलं मनापासून केलं.  मनापासून वाटलं म्हणून ती लग्नाआधीच तिथे  राहायला गेली..', असं सुनील तावडे म्हणाले.

नाटकाबाबत सुनील तावडे नेमकं काय म्हणाले? (Sunil Tawade on Theatre)

'आपल्यामुळे नाटक बंद होता कामा नये. यामुळे मी आयुष्यात आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष दिलं.  पैसे भले कमी मिळाले किंवा नाही मिळाले. ठीक आहे. पण आरोग्याची काळजी घेणे, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मी रोज सकाळी 4 वाजता उठतो.  पैसे कमावले तर, ते उपभोगण्यासाठी हेल्थ चांगली पाहिजे. हे सगळे पैसे डॉक्टरला दिले, तर काय उपयोग या सगळ्या गोष्टींचा. 1000 रुपये आपण  कमावले तर, 50 रुपये डॉक्टरांकडे खर्च केले तर, आपण समजू शकतो. पण जर 1000 रुपये कमावले त्यातील 999 रुपये डॉक्टरांकडे खर्च झाले तर, 1 रुपयाचं करायचं काय?, असं सुनील तावडे म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Ramayan OTT Deal: रामायणसाठी 700 कोटींची OTT डील क्षणार्धात धुडकावली; 4000 कोटी वसूल करण्यासाठी मेकर्सचा तगडा प्लॅन?

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget