एक्स्प्लोर

'लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं...' अतुल कुलकर्णींच्या कवितेची सगळीकडे चर्चा, सध्याच्या राजकारणावर नेमकेपणानं ठेवलं बोट!

Atul Kulkarni : अभिनेते अतुल कुलकर्णी यांची कविता सध्या चर्चेचा विषय बनली आहे. त्यांनी सध्याच्या मतांच्या राजकारणावर या कवितेच्या माध्यमातून बोट ठेवलं आहे.

Atul Kulkarni : मराठमोळे अभिनेते अतुल कुलकर्णी हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गद अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अभिनयाच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभरात आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवलेला आहे. अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी भरीव आणि उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यांचा साहित्य क्षेत्रातील व्यासंगही प्रचंड मोठा आहे. ते सध्याच्या साहित्यिक, राजकीय परिस्थितीवर वेळोवेळी भाष्य करत असतात. सध्या ते एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी एक कविता लिहिली आहे. हीच कविता सध्या चर्चेत आहेत. 

अतुल कुलकर्णी यांनी एक कविता लिहिली आहे. ही कविता त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. त्यांनी या कवितेत राजकारण, मतदान, लोकांची मानसिकता यावर बोट ठेवलं आहे. राजकारणी लोक सामान्य मतदारांचा फायदा कसे घेतात, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी अतुल कुलकर्णी यांनी केला आहे. 

अतुल कुलकर्णींची नेमकी कविता काय आहे? 

लोक-मताची डुबकी

मतं गर्दी करतात...
मतं डुबकी घेतात
लोक चिरडले जातात 
लोकांची प्रेतं बनतात 
लोक रडतात भेकतात 
लोक शांsssत होतात

पाच वर्षं सरतात 
बारा वर्ष सरतात
परत, 
मतं गर्दी करतात 
मतं डुबकी घेतात

लोक चिरडले जातात 
लोकांची प्रेतं बनतात 
लोक रडतात भेकतात 
लोक शांsssत होतात, 
परत...

मतं मनोरे रचतात 
मतं जल्लोष करतात

लोक कोसळून पडतात 
लोक घायाळ होतात 
लोक रडतात भेकतात 
लोक शांsssत होतात

पाच वर्षं सरतात 
बारा महिने सरतात

परत, 
मतं मनोरे रचतात 
मतं जल्लोष करतात
लोक कोसळून पडतात 
लोक घायाळ होतात 
लोक रडतात भेकतात 
लोक शांsssत होतात, 
परत...


मतं रक्तं सांडतात 
लोक शांत राहतात
लोक भक्तं असतात 
लोक मतं 'बनतात' 
मतं अंधळी होतात 
लोक ठेचा खातात
मतं रक्तं सांडतात 
लोक शांत राहतात, 
परत...

हेही वाचा :

Khushi Kapoor: श्रीदेवीच्या लाडक्या लेकीचं नवं फोटोशूट; पांढऱ्या स्कर्टमध्ये दिसतेय ग्लॅमरस!

Rupali Chakankar: अश्लील शो बंद करा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या पोलिसांना सूचना

Chhava Movie Screening: 'छावा'चा 'तो' सीन पाहून संताप अनावर; प्रेक्षकांमधून एकजण उठला अन् थिएटरमधली स्क्रिन फोडली

महत्त्वाच्या बातम्या

Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
Sayaji Shinde On Omraje Nimbalkar: ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
ती झाडं आता कुठेयत? सयाजी शिंदेंनी खासदार ओमराजे निंबाळकरांना भरमंचावर विचारलं अन्..; धाराशिवच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget