एक्स्प्लोर

Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

Prabhas Freedom Fighter movie: प्रभासचा रांगडा 'फौजी' अवतार. इंटरनेटवर 'फौजी'चीच चर्चा.

Prabhas Freedom Fighter movie Fauji: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या (Prabhas) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी.  प्रभासचा आगामी बहुप्रतिक्षित 'फौजी' (Fauji) सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.  स्वातंत्र्य दिना निमित्त ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.   गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'फौजी' या सिनेमाची प्रचंड चर्चा रंगली होती. दरम्यान, 15 ऑगस्टचे औचित्य साधत 'फौजी' या सिनेमाच्या फिल्ममेकर्सने 'फौजी' या सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. दरम्यान, 'फौजी' या सिनेमाच्या फिल्ममेकर्सने  एक दमदार आणि जबरदस्त फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित केला आहे (Entertainment). ज्यामुळे सोशल मीडियावर अक्षरश: नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नेटकऱ्यांनी कमेंटमधून हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली आहे.  

हनु राघवपुडी दिग्दर्शित 'फौजी' हा सिनेमा अॅक्शन सिनेमा असून, हा चित्रपट 3 डिसेंबर  2026 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. माइथ्री मुव्ही मेकर्स आणि टी-सिरीजच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेला 'फौजी' हा बिग बजेट सिनेमा विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  हा सिनेमा तेलुगु, हिंदी, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा वर्ल्डवाईड प्रदर्शित होणार आहे. सध्या 'फौजी' या सिनेमाच्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये प्रभासचा रांगडी अवतार लक्षवेधी ठरत आहे. प्रभास या सिनेमात सर्वात रांगड्या आणि राकट अवतारासत दिसत आहे. 

प्रभासचा आगामी सिनेमा 'फौजी'चा पोस्टर रिलीज (Prabhas Turns Freedom Fighter In Fouji First Look Poster)

प्रभास अनवाणी पायांनी पुढे चालताना दिसत आहे.   तसेच रक्ताने माखलेले पांढरे बनियान, धोतर घालून  दोन्ही हातात रिव्हॉलव्हर धरलेला दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील राग आणि  रक्ताचे डाग एक थरारक अॅक्शन सीन असल्याचं स्पष्ट संकेत देत आहेत.   या फर्स्ट लूकमध्ये  ऐतिहासिक चारमिनार दिसत आहे. पोस्टरमधील लक्षवेधी भाग म्हणजे, प्रभासच्या हातात शस्त्र आहेत.  तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधी हातात काठी घेऊन पुढे जात असताना दिसत आहेत.  गांधींजींची शांततापूर्ण वाटचाल आणि प्रभासचा क्रूर, हिंसक मार्ग.  या सिनेमातून भारताच्या स्वातंत्र्य  लढ्याची  न सांगितलेली पाने उजेडात येतील.

'फौजी' या सिनेमाचा टॅगलाईन 'A Battalion who Fights Alone', असं आहे.   प्रभासने यात स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारली आहे. तर,  महात्मा गांधी यांची भूमिका कुणी साकारली? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.   हा सिनेमा 3 डिसेंबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या  'फौजी' या सिनेमाची  प्रचंड चर्चा होत आहे. या सिनेमातून कोणती कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार? यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान, प्रभासच्या आगामी पोस्टरमधील दमदार लूक पाहून त्याच्या चाहत्यांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
Himanshi Khurana: 'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
'पापा माझ्या मम्मीला खूप मारायचे, हातही तोडला अन्...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, नेमकं काय म्हणाली?
Box Office Collection: पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
पहिला दिवस निराशाजनक; पण 15 ऑगस्टला सनी देओल बॉक्स ऑफिसवर सुस्साट; 'आवारापन 2’ चा धुडगूस कायम; कोणी किती कमावले?
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Embed widget