एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil Movie : दगडीचाळ गाजवणारा 'डॅडी' आता मनोज जरांगेंच्या भूमिकेत, जरांगे पाटलांवरील दोन सिनेमे बॅक टू बॅक रिलीज होणार!

Manoj Jarange Patil Movie : मनोज जरांगे यांचा जीवनपट उलगडून सांगणारा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मनोज जरांगे यांच्यावरील एक नव्हे तर दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॅक टू बॅक आठवड्यात हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. '

Manoj Jarange Patil Movie : मराठा आंदोलक (Maratha Reservation Protest) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन राज्यात पुन्हा एकदा नव्याने उभारले. गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी निर्णायक संघर्ष उभा केला. आता मनोज जरांगे यांचा जीवनपट उलगडून सांगणारा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मनोज जरांगे यांच्यावरील एक नव्हे तर दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बॅक टू बॅक आठवड्यात हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाची टीझर लाँच करण्यात आला. हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे हे या चित्रपटात मनोज जरांगे यांची भूमिका साकारणार आहे. 
 
'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. नारायण प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर  चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीचं असणार असल्याचे दिग्दर्शक योगेश भोसले यांनी म्हटले.  

या चित्रपटाची संकल्पना डॉ. मधुसूदन मगर यांची असून, या  चित्रपटाची कथा - पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत.  चित्रपटाची गीते  सुरेश पंडित,पी  शंकराम यांनी संगीतबद्ध केली आहेत. मंगेश कांगणे, सुरेश पंडित, पी शंकराम यांनी चित्रपटाची गीते लिहिली आहेत.  हिंदीचे सुप्रसिद्ध दिग्गज गायक सोनू निगम, मराठी व हिंदीत नावाजलेले संगीतकार व गायक अजय गोगावले, नकाश अझीझ, आदर्श शिंदे, यांच्या सुमधुर सुरांनी चित्रपटाची गाणी स्वरबद्ध केली आहेत. 

चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी

'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा'  या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, सुबोध भावे,  प्रसाद ओक,  अजय पुरकर,  विजय निकम,  कमलेश सावंत,  भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे आदी कलाकारांची मांदियाळी दिसणार आहे. 

या  चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, दादा दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. 

बॅक टू बॅक चित्रपट प्रदर्शित होणार...

'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा'  हा चित्रपट  14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तर, पुढील आठवड्यात 21 जून रोजी 'संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संघर्ष योद्धा चित्रपटाची रिलीज डेट निवडणूक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली. 

पाहा टीझर : Amhi Jarange | Official Teaser | Narayana Productions | Makrand Deshpande | 14 June

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Mhada News : म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी
म्हाडा वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंची निर्मिती करणार, 15 हजार कोटींचं बजेट मंजूर
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची हत्या?Anjali Damania यांचा संशयSuresh Dhas PC : गिते गँगकडून घुले, वाल्मिक कराडची धुलाई, बीड जेलमधील मारहाणीची इनसाईड स्टोरीGold Price Hike : सोन्याच्या दरात मोठी वाढ! सध्या जीएसटीसह सोन्याचे दर 93 हजार रुपयांवरWalmik Karad News : बीड जेलमध्ये वाल्किक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण- सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Jail Gang War : वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
वाल्मिक कराडला बीड कारागृहात गिते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; गृहमंत्र्यांकडे मोठी मागणी
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
ईद दिवशीच धमाका, भारताचा दुश्मन हाफिज सईदचा खास अब्दुल रहमानचा खात्मा, दहशतवाद्यांच्या फायनान्सरला कराचीमध्ये गोळ्या घातल्या
Mhada News : म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी
म्हाडा वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंची निर्मिती करणार, 15 हजार कोटींचं बजेट मंजूर
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराडला 1-2 चापटा मारल्या, अंजली दमानियांनी सांगितलं बीड तुरुंगात नेमकं काय घडलं?
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Video : पालघरमध्ये मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलावरून अचानक राॅकेलचा टँकर थेट 20 फूट खाली कोसळला; जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
Video : नोकरी सरकारी अभियंत्याची, लव्ह मॅरेज केलं; त्याच बायकोला घरीच आशिकसोबत रंगेहाथ पकडलं, बायको अभियंत्याला वायपरने चोपत म्हणाली, तुकडे करून ड्रममध्ये भरेन!
RBI : गृह कर्ज अन् वाहन कर्ज आणखी स्वस्त होणार? आरबीआय एप्रिलमध्ये 'या' तारखेला पतधोरण जाहीर करणार
घर अन् वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,आरबीआय व्याज दर घटवणार? पतधोरण 'या' दिवशी जाहीर होणार
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ
Embed widget