एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Manvat Murders : महाराष्ट्र हादरवणाऱ्या भयानक हत्याकांडावर आधारित वेब सीरीज, क्राइम थ्रिलर 'मानवत मर्डर्स'चा रोमांचक टीझर आऊट

Manvat Murders Web Series Release Date : मानवत मर्डर्स वेब सीरिज 70 च्या दशकातील भयानक हत्याकांडावर आधारित आहे. याचा रोमांचक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Manvat Murders Web Series : महाराष्ट्र हादरवणाऱ्या घटनेवर आधारित 'मानवत मर्डर्स' वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मानवत मर्डर्स' या क्राइम थ्रिलर वेब सीरीजचा दमदार टीझर समोर आला आहे. सोनी लिव्‍ह रोमांचक क्राइम थ्रिलर सीरीज 'मानवत मर्डर्स' घेऊन येत आहे. मानवत मर्डर्स वेब सीरिज 70 च्या दशकातील भयानक हत्याकांडावर आधारित आहे. महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या स्‍टोरीटेलर्स नूक प्रोडक्शन हाऊस आणि गिरीश जोशी यांची निर्मिती असलेल्या सीरीजचे दिग्‍दर्शक आशिष बेंडे आहेत.

महाराष्ट्र हादरवणाऱ्या घटनेवर आधारित वेब सीरीज

भारताचे शेरलॉक होम्‍स म्‍हणून ओळखले जाणारे सीआयडीमधील प्रतिष्ठित डिटेक्टिव्‍ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची आत्‍मचरित्रात्‍मक कलाकृती 'फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम'वर आधारित 'मानवत मर्डर्स' या सीरीजमध्‍ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्‍हणकर असे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या वेब सीरिजमध्ये 'मानवत मर्डर्स' महाराष्ट्रातील सर्वात भयानक ऐतिहासिक घटनेचा उलगडा होणार आहे, ज्या घटनेनं 70 च्या दशकात देशाला हादरून टाकलं होतं. 

क्राइम थ्रिलर 'मानवत मर्डर्स'चा रोमांचक टीझर आऊट

आशिष बेंडे यांचे दिग्‍दर्शन असलेल्‍या 'मानवत मर्डर्स' आगामी सीरीजमध्‍ये या भयानक हत्याकांडाचा उलगडा होणार आहे. रमाकांत एस. कुलकर्णी यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत तपास पथक या खटल्‍याची तपासणी करताना पाहायला मिळणार आहे. आशुतोष गोवारिकर रमाकांत कुलकर्णी यांच्या भूमिकेत या गुंतागूंतीच्‍या केसचा उलगडा करताना दिसतील. 1970च्‍या दशकातील ग्रामीण महाराष्‍ट्रातील गूढ हत्‍यांची मालिका सोडवण्‍याच्‍या आव्‍हानांचा त्यांच्या पुढे असणार आहे. यादरम्‍यान रमाकांत कुलकर्णी ही गुंतागुंतीची केस सोडवू शकतील का आणि वेळ निघून जाण्यापूर्वी पीडितांना न्‍याय मिळवून देतील का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेब सीरिज पाहावी लागणार आहे. 

पाहा 'मानवत मर्डर्स'चा रोमांचक टीझर

View this post on Instagram
 
A post shared by Sony LIV (@sonylivindia)

'मानवत मर्डर्स' रिलीज डेट

'मानवत मर्डर्स' वेब सीरिजमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'मानवत मर्डर्स' ची  मिस्ट्री सोडवण्याची जबाबदारी सीआयडी ऑफिसर रमाकांत कुलकर्णी यांच्या खांद्यावर असेल. रमाकांत कुलकर्णीची भूमिका आशुतोष गोवारिकर यांनी निभावली आहे. 4 ऑक्टोबरला 'मानवत मर्डर्स' ही वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर रिलीज होईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : बिग बॉसला आलाय 'मदमस्त' निक्कीचा पुळका? थेट जान्हवीलाच आदेश देत म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Embed widget