Malaika Arora: मलायका अरोरा बिझनेसमनच्या प्रेमात; 19 वर्षांनी लहान जोडीदार का निवडला? 'या' व्यक्तिने उलगडलं गुपित
Malaika Arora Dating Diamond Businessman Harsh Mehta: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Malaika Arora Dating Diamond Businessman Harsh Mehta: वयाची पन्नाशी ओलांडलेली मलायका अरोरा (Malaika Arora) आजही कित्येक तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. कधीकाळी सलमान खानची (Salman Khan) वहिनी असणाऱ्या मलायकानं अरबाज खानसोबत (Arbaaz Khan) घटस्फोट घेतला आणि आज ती सिंगल आहे. पण, सध्या सुरू असलेल्या चर्चांनुसार, मलायका लवकरच मिंगल होण्याच्या तयारीत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Bollywood Actress Malaika Arora) सध्या तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अरबाज खानसोबतच्या घटस्फोटानंतर ती अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनशिपमध्ये होती. पण, काही दिवसांतच मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झालं. अर्जुनपासून वेगळं झाल्यानंतर, ती आता हिरे व्यापारी हर्ष मेहताला डेट करतेय, जो तिच्यापेक्षा 19 वर्षांनी लहान आहे. अशातच चर्चा रंगल्या आहेत की, मलायका सतत स्वतःपेक्षा लहान वयाच्या पुरुषांना डेट का करते? प्रसिद्ध वरिष्ठ महिला पत्रकारानं मलायकाच्या डेटिंग लाईफबाबतचा गौप्यस्फोट केला आहे.
मलायका सतत लहान पुरुषांनाच का डेट करते? (Malaika Arora Dating Businessman Harsh Mehta)
मलायका अरोराच्या रिलेशनशिप नेहमीच चर्चेचा विषय राहिलंय. ब्रँड एंडोर्समेंट्स मिळवण्यासाठी आणि सिनेसृष्टीत एक विशिष्ट ट्रेंड किंवा बेंचमार्क प्रस्थापित करण्यासाठी ती लहान वयाच्या पुरुषांना डेट करते, अशी चर्चा किंवा तर्क लावले जातात. यात कितपत तथ्य आहे? याचा खुलासा एका वरिष्ठ महिला पत्रकारानं एका पॉडकास्टमध्ये बोलताना केलाय.
View this post on Instagram
सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टवर बोलताना एका ज्येष्ठ महिला पत्रकारानं सांगितलं की, महिलांनी स्वतःपेक्षा लहान वयाच्या पुरुषांना डेट करणं ही काही असामान्य गोष्ट नाही, चाळीशीतील पुरुषही विशीतील महिलांना डेट करतात आणि त्यांच्याशी लग्न करतात, तरीही अशा पुरुषांना कोणतेही विशिष्ट लेबल लावलं जात नाही. पुढे बोलताना वरिष्ठ पत्रकारानं म्हटलंय की, स्वतःपेक्षा खूप लहान वयाच्या महिलांना डेट करू पाहणाऱ्या पुरुषांच्या मनात अनेकदा असुरक्षिततेची भावना असते. त्यांनी स्पष्ट केलं की, मलायका वयानं मोठ्या पुरुषांना डेट करणं टाळते कारण ती आता प्रगल्भ, स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे. जर तिनं वयानं मोठ्या पुरुषाला डेट केलं, तर तिला होणारी अनावश्यक विचारणा किंवा लोकांची टीका कदाचित आवडणार नाही. याशिवाय, तिच्या वयाचा पुरुष कदाचित तिशीच्या वयातील महिलेला डेट करत असू शकतो, मग तिनं वयानं मोठ्या पुरुषाला डेट करणं का पसंत करावं?
पॉडकास्टमध्ये बोलताना ते म्हणाले की, मला असं वाटतंय मलायकाला तिच्या लेव्हलचं कुणी मिळतच नाहीये. त्यामुळे ती वयानं लहान असलेल्या मुलांना डेट करतेय. ती आत्मनिर्भर महिला आहे. असं असू शकतं की, लोक तिच्यामुळे दडपणाखाली येत असतील, किंवा कदाचित पुरुषांचा अहंकार यात अडथळा ठरत असेल. मात्र, जे पुरुष स्वतःच्या आयुष्यात समाधानी आणि आत्मविश्वासी असतात, ते मलायकासारख्या स्त्रियांची, म्हणजेच त्यांच्यापेक्षा अधिक यशस्वी असलेल्या स्त्रियांची कदर करतात. मला असं वाटतं की, मलायकाच्या बाबतीत नेमके हेच घडतंय..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















