Sushmita Mukherjee: 'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
Sushmita Mukherjee works in C Grade Film: आर्थिक संकटामुळे सुष्मिता मुखर्जी यांनी सी ग्रेड सिनेमात काम केलं.

Sushmita Mukherjee works in C Grade Movie: टीव्ही ते सिनेमा, सुष्मिता मुखर्जी (Suhmita Mukherjee) यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'गोलमाल' (Golmaal)मधील त्यांची व्यक्तीरेखा प्रचंड गाजली. आज त्यांची विशेष ओळख करुन देण्याची गरज नाही. पण एक काळ असा होता की, त्यांना सी ग्रेड सिनेमांमध्येही काम करण्याची वेळ आली होती. अभिनेत्रीच्या डोक्यावर एक कोटीचं कर्ज होतं. खरंतर, तिची प्रॉडक्शन कंपनी दिवाळखोर झाली होती. यानंतर त्यांनी काही सी- ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. खरंतर, त्यांनी ही स्व खुशीने केलं नाही. परिस्थितीमुळे त्यांना हे पाऊल (Entertainment) उचलावं लागलं.
कर्ज फेडण्यासाठी अभिनेत्रीला सी ग्रेड सिनेमात काम करावं लागलं (Sushmita Mukherjee one crore debt)
IANSच्या मते सुष्मिता मुखर्जी, 'मला कुणीतरी सांगितलं होतं की, मॅम तुम्ही खराब सिनेमांमध्ये का काम केलं? माझ्या आयुष्यातील त्या कठीण काळाबद्दल आठवण काढली की, खूप त्रास होतो. महिलांचा अपमान आणि सेक्सिस्ट - सी ग्रेड सिनेमांमध्ये मी का काम केलं? असा विचार मनात आला तर खूप त्रास होतो. पण माझ्या कारकिर्दीत मी चांगल्या सिनेमांमध्येही काम केलं. पण मी पोर्नोग्राफीमध्ये काम केलं नाही. बस, काही चित्रपट खराब होते. मी काही चुकीच्या सिनेमांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला'.
'मी माझा आत्मा विकला होता का? हो,... अर्थातच मी माझा आत्मा विकला. मला तशा प्रकारच्या सिनेमांमध्ये काम करुन चांगलं वाटलं? तेव्हा देखील चांगलं नाही वाटलं, आता देखील चांगलं वाटत नाही. पण तेव्हा माझी काही मजबुरी होती', असं सुष्मिता मुखर्जी म्हणाल्या. सुष्मिता मुखर्जी यांनी आपल्या कारकिर्दीत, शाहरुख खानची फिल्म 'अंकल' अजय देवगनचा सिनेमा 'गोलमाल', संजय दत्तचा 'खलनायक' आणि प्रियांका चोप्राच्या 'दोस्ताना'मध्येही काम केलं. त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं जातं.
'माझ्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगायचं झाल्यास, 2002 साली पती आणि माझी मीडिया कंपनी Prayas प्रॉडक्शन कंपनी दिवाळखोर झाली. त्यावेळी नवीन टेक्नोलॉजी आली होती. त्या टेक्नोलॉजीबाबत खास काही ठाऊक नव्हतं. आमच्या घरी लोनचे पैसे घेण्यासाठी लोक यायचे. कर्ज फेडण्यासाठी मी आणि माझ्या पतीने भरपूर मेहनत घेतली. 3-4 वर्षांत आम्ही कर्जाची रक्कम फेडली. त्यामुळे मला तशाप्रकारच्या सिनेमांमध्ये काम करावं लागलं', असं अभिनेत्रीने सांगितलं. 'आता मी चांगलं कमावते आणि मनाला चांगलं वाटेल अशा भूमिका साकारत आहे', असंही सुष्मिता म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























