Makarand Deshpande : मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणावर, सिनेमात भूमिका साकारणारे मकरंद देशपांडे म्हणतात, 'आता त्यांचं असणं...'
Makarand Deshpande :आम्ही जरांगे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यानमित्ताने या सिनेमाच्या टीमने एबीपी माझासोबत संवाद साधला.
Makarand Deshpande on Manoj Jarange Patil : अंतरावाली सराटीमध्ये सुरु झालेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाने आता राज्यव्यापी स्वरुप घेतलं आहे. यामधून पुढे आलेलं मनोज जरांगे हे नाव सध्या राज्यातच नाही, तर देशभरात गाजतंय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी (Manoj Jarande) अगदी मुंबईची वाट धरली. पण मुंबईच्या वेशीवरच राज्य सरकारला हे आंदोलन थांबवण्यात यश आलं. पण आता पुन्हा एकदा या आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण केलंय. कारण पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची हाक दिली असून आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा हा लढा आता मोठ्या पडद्यावर देखील साकारला जाणार आहे. त्यानिमित्ताने आम्ही जरांगे या सिनेमाच्या टीमने एबीपी माझासोबत संवाद साधला.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये विशेष करुन मराठवाड्यात मनोज जरांगे हा विषय फार महत्त्वाचा ठरला. पण पुन्हा एकदा जरांगे यांनी उपोषण सुरु केल्यानंतर शासनाकडूनही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं जातंय. या सगळ्यावर आम्ही जरांगे या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका साकारणाऱ्या मकरंद देशपांडे यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी मनोज जरांगे यांच्या पाठिशी असलेल्या प्रत्येकाला एक आवाहन देखील केलं आहे.
जरांगेंना वाचवण्याचं केलं आवाहन
लोकसभेमध्ये मनोज जरांगे हा विषय अगदी महत्त्वाचा ठरला आणि आता सुरु झालेलं आंदोलन या प्रश्नाचं उत्तर देताना मकरंद देशपांडे यांनी यावर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, असं म्हणतात ना डोन्ट अंडरएस्टिमेट पॉवर ऑफ कॉमन मॅन. मूळात आज जरांगे जी म्हणतील ती पूर्वदिशा आहे. त्यांच्यावर जो विश्वास टाकलाय तो अतूट आहे. आज त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मी आज मराठा समाजाला आवाहन करतो की, जरांगेंना वाचवा. अजिबात त्यांची तब्येत बिघडू देऊ नका. कारण ते असायलाच हवा. लढा हा बलिदानाने होतो हे खरंय, पण आता मला जर विचारल तर मी एवढं म्हणेन की जरांगेंचं असणं जास्त गरजेचं आहे. च
आम्ही जरांगेंच्या पाठिशी - योगेश भोसले, दिग्दर्शक
सिनेमाच्या दिग्दर्शकाने यावर म्हटलं की, आज संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे यांच्या पाठिशी आहे. आज ते मराठ्यांच्या लेकरांसाठी लढा देतायत. त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठीची ही त्यांची लढाई आहे. त्यासाठी आज ते उपाशी पोटी आंदोलन करतायत. मी फक्त ऐवढच म्हणीन की आम्ही तुमच्यासोबत आहोत.