Majha Katta : कसं होतं सत्यदेव दुबे नावाचं विद्यापीठ? संदीप कुलकर्णी यांच्याकडून आठवणींना उजाळा, राजश्रीनेही उलगडला अभिनयाचा प्रवास, माझा कट्ट्यावर सत्यशोधकच्या निमित्ताने खास संवाद
Majha Katta : सत्यदेव दुबे यांच्याकडे संदीप कुलकर्णी यांच्याप्रमाणे अनेकांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत. त्याविषयीच्या आठवणींना संदीप कुलकर्णी यांनी उजाळा दिला.
मुंबई : संदीप कुलकर्णी (Sandeep Kulkarni) त्यांच्या मोजक्या पण सकस भूमिकांसाठी ओळखले जातात. डोंबिवली फास्ट, शूल, श्वास, हजारो खवाईशे ऐसी, ट्रॅफिक सिग्नल, दुनियादारी मधल्या त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहतात.तर राजश्री (Rajshri Deshpande) ने सेक्रेड गेम्स, सेक्सी दुर्गा, चोक्ड, अँग्री इंडियन गाॅडेसेस मध्ये केलेलं काम तिच्या अभिनयातील वेगळेपणाची साक्ष देतात. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी माझा कट्ट्यावर (Majha Katta) भाष्य केलं आहे.
मी जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये होतो. तेव्हा सई परांजपेसोबत एक नाटक केलं होतं. माझा खेळ मांडू दे हे नाटक आम्ही केलं. त्यानंतर मी तिच्यासोबत खूप काम केलं. आमच्या पेंटरचा एक ग्रुप देखील होता, तेव्हा मला चित्रपट पाहण्याचं वेड लागंल. त्यानंतर माझी सत्यदेव दुबे यांच्याशी गाठ पडली आणि कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, हा त्यांचा प्रवास संदीप कुलकर्णी यांनी माझा कट्ट्यावर उलगडला.
कितीतरी पिढ्या दुबे यांनी घडवल्या - संदीप कुलकर्णी
सत्यदेव दुबे यांच्याकडे संदीप कुलकर्णी यांच्याप्रमाणे अनेकांनी अभिनयाचे धडे गिरवले आहेत. त्याविषयी बोलताना संदीप कुलकर्णी यांनी म्हटलं की,आम्ही त्यांना नॅशनल स्कूल ऑफ दुबे असं म्हणायचो. त्यांचे विद्यार्थी म्हणजे त्यांनी तयार केलेले आम्रीशपुरी. दुबेजी यांचं सगळ्या पहिलं म्हणजे ते सगळ्याचं इगो क्रॅश करायचे, आम्रीशपुरी यांच्यासोबत देखील असंच काहीसं झालं. ती एक गुरु शिष्याची परंपरा होती. मी सत्यदेव यांच्याकडे जे शिकलो ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. अमोल पालेकर हे तेव्हा आम्हाला सिनियर होते. त्यांनी कितीतरी पिढ्या घडवल्या आहेत. मराठीवर त्यांचं विशेष प्रेम होतं. त्यांच नेहमी असं म्हणणं होतं की, तुम्हाला शब्दाचा अर्थ आणि महत्त्व कळायला हवं. हेच आम्हाला सत्यदेव दुबे यांनी शिकवलं.
राजश्रीच्या जिद्दीचा प्रवास
राजश्री देशपांडे हिने देखील तिच्या अभिनयाचा प्रवास यावेळी माझा कट्ट्यावर उलगडला. यावर बोलताना तिनं म्हटलं की, माझं शिक्षण औरंगाबादमध्ये झालं. तिथे मी नाटकात बरीच कामं केली. पुण्यात आल्यांनंतर मी लॉचं शिक्षण घेतलं. त्यावेळी देखील मी अनेकांच्या संपर्कात होते. मी पुण्यात काम केल्यानंतर मला जाणीव झाली की मला असं वाटलं की मी दुसरं काहीच करत नाहीये. त्यानंतर मी ते सगळं मुंबईला आले आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून काम करायला सुरुवात केली.
नाटकासोबत समाजकार्याला सुरुवात
नाटकासोबत मग मी समजाकार्य करण्यास देखील सुरुवात केली. नेपाळमधील भूकंपाच्यावेळी मी काम केलं. मी दुष्काळग्रस्त भागातून आहे, त्यासाठी काम करणं गरजेचं असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मी माझं काम करत सिनेसृष्टीत काम करत राहिले, असं राजश्रीने म्हटलं.