एक्स्प्लोर

Maharani 2 Twitter Review : पुन्हा एकदा दिसली ‘राणी भारती’ची जादू! ‘महारानी 2’वर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

Maharani 2 : ‘महारानी’ वेब सीरिजचा दुसरा सीझन अर्थात ‘महारानी 2’ (Maharani 2) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Maharani 2 : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) अभिनित 'महारानी' (Maharani) या सीरिजने लक्षवेधक कथानकासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रबळ राजकीय नेता म्‍हणून उदयास येण्‍यासाठी समाजातील पुरूषप्रधान अडथळ्यांचा सामना करणाऱ्या प्रमुख नायिकेच्‍या अवतीभोवती केंद्रित या सीरिजच्‍या पाहिल्या पर्वाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. प्रेक्षक या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. ‘महारानी’ वेब सीरिजचा दुसरा सीझन अर्थात ‘महारानी 2’ (Maharani 2) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘महारानी 2’ (Maharani 2) हे वेब सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली आहे. जिथे 'महारानी 1' संपला होता, तिथून दुसऱ्या सीझनच्या कथेची सुरूवात झाली आहे. या सीझनमध्ये भीम भारती तुरुंगाबाहेर आपली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याला त्याची गमवलेली सत्ता परत मिळवायची आहे आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. पुन्हा एकदा त्याचा सामना त्याची पत्नी ‘राणी भारती’ हिच्या बरोबर पाहायला मिळणार आहे. सीझन 1मध्ये बिहारच्या सत्ताकारणाची झलक मिळाली. परंतु, सीझन 2 यापेक्षा खूप काही धमाके पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना देखील या सीरिजचा दुसरा सीझन आवडला आहे.

कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव

‘राणी भारती’च्या भूमिकेत हुमा कुरेशीच्या कामाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. 'महाराणी 2' मध्ये बिहारच्या मुख्यमंत्री राणी भारती यांना केवळ राजकीय प्रतिस्पर्धी नवीन कुमार यांच्याच नव्हे, तर तिच्या पतीच्या अर्थात भीमा भारती यांच्या विरोधाचाही सामना करावा लागतो आहे. आरक्षणाच्या मागण्या, वेगळे झारखंड राज्य आणि याच दरम्यान देशाला हादरवून सोडणारे एक वेदनादायक बलात्कार-हत्या प्रकरण, या ट्रॅकवर ‘महारानी 2’ची (Maharani 2) कथा पुढे जाते.

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

‘महारानी 2’मधील मुख्य पात्र अर्थात हुमा कुरेशी (Huma Qureshi), सोहम शाह (Sohun Shah), आणि अमित सियाल (Amit Siyal) यांच्या अभिनयाचे प्रेक्षक तोंडभरून कौतुक करत आहेत. या वेब सीरिजवर प्रेक्षकांनी आणि नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या वीकेंडला ‘महारानी 2’ वेब सीरिज रिलीज झाल्याने तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

'महारानी 2'चे दिग्‍दर्शन रविंद्र गौतम यांनी केले आहे, तर सुभाष कपूर व नंदन सिंह हे या सीरिजचे लेखक आहेत. हुमा कूरेशी प्रमुख भूमिकेत असलेल्‍या या सीरिजमध्‍ये सोहम शाह, अमित सियाल, विनीत कुमार, इनाम उल हक, दिब्‍येंदू भट्टाचार्य, कनी कस्‍तुरी, प्रमोद पाठक आणि विनीत कुमार हे देखील प्रमुख भूमिकेत दिसले आहेत.

हेही वाचा: 

Maharani 2 : 'महारानी 2'मध्ये मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठेची एंट्री, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!

ओटीटी धमाका! या आठवड्यात 'दिल्ली क्राईम सीजन टू' ते येत आहेत एकाहून एक जबरदस्त वेबसिरीज, पाहा संपूर्ण लिस्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget