Maasa Short Film : मराठमोळ्या अमृता सुभाषची बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये भरारी; लॉस एंजलिसमध्ये होणार 'मासा'चं स्क्रिनिंग
मासा (Maasa) या शॉर्ट फिल्मचं स्क्रिनिंग Hollywood International Diversity Film Festival मध्ये होणार आहे.
Maasa Short Film : सध्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे चित्रपट आणि लुघपट प्रेक्षक आवडीनं बघतात. ओटीटीवर आणि छोट्या पडद्यावर अनेक वेळा काही शॉर्ट फिल्म्स लोक पाहतात. या लुघपटांचे कथानक प्रेक्षकांना आवडते. आता एका मराठी लघुपटाचे स्क्रिनिंग थेट कॅलिफोर्नियामधील लॉस एंजलिसमध्ये होणार आहे. मासा (Maasa) या शॉर्ट फिल्मची निवड Hollywood International Diversity Film Festival मध्ये झाली आहे.
Hollywood International Diversity Film Festival मध्ये मासा या चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. 13 ऑगस्ट रोजी हे स्क्रिनिंग होणार आहे. हॉलीवूडमधील कॉम्प्लेक्स थिएटर्स आणि स्टुडिओमध्ये पॅसिफिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता हे स्क्रिनिंग होणार आहे. या लघुपटामध्ये अभिनेत्री अमृता सुभाषनं प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरनं या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर प्रज्ञा दुगल, तेज दुगल आणि फुलवा खामकर, अमर खामकर यांच्या पी.एस.डी.जी स्टुडिओज या प्रोडक्शन हाऊसनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संदेश कुलकर्णी यांनी या लघुपटाचं कथानक लिहिलं आहे. फुलवानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या फिल्म फेस्टिव्हलची माहिती दिली आहे.
मराठमोळ्या अमृता सुभाषची हॉलिवूड भरारी
अभिनेत्री अमृता सुभाषनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबर बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. तिनं अनेक हिंदी वेब सीरिज आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तिच्या गली बॉयमधील अभिनयानं अनेकांचं मन जिंकलं आता अमृताची मासा ही शॉर्ट फिल्म लॉस एंजलीसमध्ये दाखण्यात येणार आहे.
फुलवाची पोस्ट:
View this post on Instagram
फुलवानं शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. अभिनेता ऋषी सक्सेना आणि अभिनेत्री दिशा परदेशी यांनीदेखील या पोस्टला कमेंट केल्या आहेत.
हेही वाचा: