Lok Sabha Result 2024 : स्मृती इराणींचं लोकसभेतील आव्हान शमलं, ज्या मतदारसंघातून राहुल गांधींचा पराभव केला तिथूनच काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला
Lok Sabha Result 2024 : अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांचा परभव केला आहे.
Lok Sabha Result 2024 : लोकसभेच्या रिंगणात सध्या चुसरशीची लढत पाहायला मिळतेय. त्यातच भाजपच्या अनेक महत्त्वाच्या उमेदवारांची यंदाच्या लोकसभेच्या रिंगणात पिछेहाट पाहायला मिळतेय. उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून स्मृती इराणी (Smriti Irani) यांचा पराभव झाला आहे. जवळपास लाखोंच्या मतांनी स्मृती ईराणी यांचं हे आव्हान शमलं आहे. त्याचप्रमाणे ज्या जागेवर स्मृती ईराणी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता. त्याच मतदारसंघात काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती ईराणी यांचा पराभव केला.
विशेष म्हणजे याच जागेवरुन स्मृती ईराणी यांनी मागील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता. पण यंदा मात्र सध्या समोर आलेल्या कलांनुसार, स्मृती ईराणी या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी प्रचंड मताधिक्याने हा विजय मिळवला आहे.
प्रियांका गांधी यांनी केलं अभिनंदन
दरम्यान त्यांच्या विजयानंतर प्रियांका गांधी यांनी देखील किशोरी लाल शर्मा यांचं अभिनंदन केलं. प्रियांका गांधी यांनी एक्स पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं की, 'किशोरीजी मला कोणतीही शंका नव्हती आणि पूर्ण खात्री होती की, तुम्ही नक्की विजयी व्हाल. अमेठीच्या जनतेचं आणि तुमचं खूप खूप अभिनंदन.'
किशोरी भैया, मुझे कभी कोई शक नहीं था, मुझे शुरू से यक़ीन था कि आप जीतोगे। आपको और अमेठी के मेरे प्यारे भाइयों और बहनों को हार्दिक बधाई ! pic.twitter.com/JzH5Gr3z30
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 4, 2024
कोण आहेत किशोरी लाल शर्मा?
किशोरीलाल शर्मा हे गांधी घराण्याच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. किशोरी लाल शर्मा यांचा जन्म लुधियानामध्ये झाला होता, ते राजीव गांधी यांच्या जवळचे होते, ते त्यांच्यासोबत पहिल्यांदा अमेठीला आले होते आणि तेव्हापासून ते येथेच राहिले.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी खासदार झाल्यापासून केएल शर्मा अमेठी आणि रायबरेली या जागांवर ग्राउंड वर्क करण्याची संपूर्ण जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळे स्थानिक लोकांपर्यंत ते पोहचले आहेत.
2019 मध्ये अमेठी मतदारसंघात राहुल गांधींचा पराभव
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी आणि स्मृती इराणी याच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा दारुण पराभव केला होता. महाराष्ट्रातही काँग्रेसची केवळ एकच जागा निवडून आली होती. दरम्यान, आता 5 वर्षानंतर जनता कोणाला निवडून देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ही बातमी वाचा :