Lok Sabha Result 2024 : अरुण गोविल यांची लोकसभेत एन्ट्री, तर मनोज तिवारींनी तिसऱ्यांना मारलं दिल्लीचं मैदान, लोकसभेच्या रिंगणात भाजपच्या सेलिब्रेटींचा 'ब्लॉकबास्टर' निकाल
Lok Sabha Result 2024 : मेरठमधून अरुण गोविल तसेच दिल्लीमधून मनोज तिवारी हे आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र आहे.
Lok Sabha Result 2024 : यंदाच्या लोकसभेच्या (Lok Sabha Result ) रिंगणात भाजपकडून सेलिब्रेटींना देखील मैदानात उतरवण्यात आलंय. त्यातच मेरठमधून छोट्या पडद्यावरील राम म्हणजेच अरुण गोविल (Arun Govil) यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्यासमोर मेरठच्या माजी महापैर सुनीता वर्मा या समाजवादी पक्षाकडून मैदानात होते. तसेच दिल्लीतूनही मनोज तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोघांनाही विश्वास दाखवत बऱ्याच मताधिक्याने विजय मिळवला.
यंदाच्या लोकभेतच भाजपकडून अनेक सेलिब्रिटी मैदानात उतरवण्यात आले होते. या सगळ्यांनी विश्वास दाखवत आता संसदेत एन्ट्री केली आहे. त्यामुळे मुरलेल्या राजकारणांप्रमाणेच सेलिब्रेटींनी देखील विजयाची गुलाल उधळला आहे.
दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेतेचे
दरम्यान दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील हे दोन्ही मतदारसंघ प्रतिष्ठेचे मानले जात आहेत. त्यातच या दोन्ही मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचंं होत. त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या रिंगणात भाजपचं सेलिब्रिटींचं तिकीट फळाला लागणार असल्याचं चित्र दिसतंय.
मेरठमध्ये भाजपचाच विजय होणार - अरुण गोविल यांचा विश्वास
दरम्यान निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अरुण गोविल यांनी मेरठमध्ये भाजपचाच विजय होणार,असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच ही निवडणूक विकसित भारतासाठी असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं. त्यातच उत्तर प्रदेशात अद्यापही भाजपचं वर्चस्व असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अरुण गोविल यांना ही निवडणूक तशी सोप्पी असल्याचा अंदाज एक्झिट पोल मधूनही समोर आला.
अरुण गोविल यांचा मेरठमधील जन्म
अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1952 रोजी मेरठ येथे झाला. त्यांनी चौधरी चरणसिंग विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. कॉलेजच्या दिवसांत ते अनेक नाटकांमध्ये भाग घ्यायचे. त्याचवेळी त्यांना रामानंद सागर यांची विक्रम वेताळ ही मालिका मिळाली. 1980 च्या दशकात, अरुण गोविल यांनी काँग्रेससाठी प्रचार केला, परंतु त्यांना राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी अनेक दशके लागली. उल्लेखनीय म्हणजे, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आर्टिकल 370 या सिनेमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती.
मंडीतून कंगनाची बाजी
अभिनेत्री कंगना रणौत हीने मंडी लोकसभा मतदारसंघातून बाजी मारली असून तिनेही संसदेत एन्ट्री केली आहे. कंगनाने काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवली. पण कंगनाने ही निवडणूक जिंकली आहे.
ही बातमी वाचा :
Kangana Ranaut Mandi Lok Sabha Election 2024 Result : कंगना रनौतचा मंडीत जलवा, 36 हजार मतांनी पुढे