Lock Upp : ‘लॉक अप’मध्ये सायशा शिंदेनं मुनव्वर फारुकीला केलं किस, प्रतिक्रिया देताना कॉमेडियन म्हणाला...
Lock Upp Update : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या ‘लॉक अप’ (Lock Upp) या शोमध्ये प्रेक्षकांना सतत काहीना काही ड्रामा पाहायला मिळत आहे.

Lock Upp : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या ‘लॉक अप’ (Lock Upp) या शोमध्ये प्रेक्षकांना सतत काहीना काही ड्रामा पाहायला मिळत आहे. या धमाल मनोरंजनामुळे प्रेक्षक देखील या कार्यक्रमाला पसंती देत आहेत. शोमध्ये सध्या रोज कुठल्या ना कुठल्या स्पर्धकाची गुपितं उघड होत आहेत. मात्र, या सगळ्यादरम्यान शोचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पर्धक सायशा शिंदे (Saisha Shinde), कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) याला चुंबन देताना दिसत आहे.
या व्हिडीओत दिसतंय की, मुनव्वर आणि प्रिन्स नरुला बसून एकमेकांशी गप्पा मारत आहेत. यानंतर सायशा त्यांच्या बाजूला येते आणि म्हणते की, ‘डोकं जळून भुसा झालंय’. यावर मुन्नवर तिला म्हणतो की, ‘जळून भुसा होत नाही तर, राख होते.’
सायशाचं मुनव्वरला चुंबन
या गप्पां दरम्यान सायशा अचानक मुनव्वर फारुकीच्या गालावर चुंबन देते. यामुळे त्याच्या गालावर लिपस्टिकचे निशाण दिसू लागतात. यानंतर सायशा त्याला म्हणते की, जा ते गालावरचे निशाण पुसून ये. त्यावर मुनव्वर म्हणतो, मी हे निशाण पुसणार नाही, असेच राहू देणार आहे. यानंतर प्रिन्स देखील दोघांची चांगलीच थट्टा करतो.
मुनव्वरवर सायशा फिदा!
मुनव्वर आपला क्रश असल्याचे अनेकदा सायशाने या शोमध्ये कबूल केले आहे. काही दिवसांपूर्वी होस्ट कंगना रनौतसोबत झालेल्या वादामुळे सायशाला या शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मात्र, तिची लोकप्रियता पाहता तिला एकाच आठवड्यात या शोमध्ये पुन्हा घेण्यात आलं. ‘लॉक अप’मध्ये परतल्यावर सायशा शिंदेने कंगना रनौतची माफी देखील मागिली होती. सायशा माफी पत्रचं घेऊन आली होती, जे तिने नॅशनल टीव्हीवर वाचून दाखवलं होतं.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
