Lock Upp Show : कंगना रनौतनं 'लॉक-अप' शोमध्ये केला गौप्यस्फोट; म्हणाली, 'बालपणी झाले होते लैंगिक शोषण'
लॉकअप (Lock Upp Show) या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये कंगनानं एक गौप्यस्फोट केला आहे.

Lock Upp Show : छोट्या पडद्यावरील लॉकअप (Lock Upp Show) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील स्पर्धक एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याचे किस्से प्रेक्षकांना सांगत आहेत. लॉकअप शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) करते. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये कंगनानं एक गौप्यस्फोट केला आहे. या कार्यक्रमात मुनव्वर फारूकीनं(Munawar Faruqui) एका टास्क दरम्यान बालपणी त्याच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबाबत सांगितलं. मुनव्वरनं सांगितलेल्या या घटनेनंतर कंगनानं देखील तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितलं.
मुनव्वर फारूकीनं सांगितलं की, जेव्हा त्याच्या एका नातेवाईकानं त्याच्यावर लैंगिक शोषण केले तेव्हा तो केवळ सहा वर्षाचा होता. मुनव्वर म्हणाला, 'मी सहा वर्षाचा होतो माझे लैंगिक शोषण करण्यात आले होते. मी 11 वर्षाचा झालो तरी माझ्यावर लैंगिक शोषण केले जात होते. माझे लैंगिक शोषण माझे एक नातेवाईक करत होते. मी तेव्हा लहान होतो. त्यामुळे मला कळत नव्हते की नक्की काय होत आहे.' मुनव्वरनं ही घटना सांगितल्यानंतर कंगना म्हणाली, 'अनेक लहान मुलांचे लैंगिक शोषण केले जाते. पण ती मुलं ही गोष्ट सांगू शकत नाहित. माझं देखील बालपणी लैंगिक शोषण केलं होतं. आमच्या शहरामधील एक मुलगा मला स्पर्श करत होता. तेव्हा मी खूप लहान होते.'
View this post on Instagram
‘लॉकअप’ शोमध्ये सर्व स्पर्धकांवर 24x7 लक्ष ठेवले जाते. Alt Balaji आणि MX Player या अॅप्सवर तुम्ही लॉकअप हा शो पाहू शकता.
हेही वाचा :
- Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
- Kshitij Date : ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमात एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा साकारणार क्षितिज दाते
- Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
