Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवालाची आई 58 व्या वर्षी जुळ्यांना जन्म देणार, मुसेवाला घराण्याला नवे वारस मिळणार!
Sidhu Moose Wala : सिद्धु मुसेवालाची आई चरण सिंह कौर रुग्णालयात दाखल झाली असून ती दोन जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Sidhu Moose Wala : दिवंगत पंजाबी सिंग सिद्धु मुसेवाला (Sidhu Moose Wala) याची आई गरोदर असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानंतर आता त्याची आई रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्याची आई चरण कौर सिंह (Sidhu Moose Wala Mother Charan Singh Kaur) ही 58 व्या वर्षी दोन जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यासाठी सिद्धुची आई रुग्णालयात दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे. पंजाब केसरीच्या रिपोर्टनुसार, सिद्धुची आई दोन जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सिद्धु मुसेवालाच्या हत्येनंतर त्याचे आईवडिल अगदीच एकटं पडल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे IVF च्या माध्यमातून त्या दोघांनीही पालक होण्याचा निर्णय घेतला होता. चरण कौर सिंह यांच्या गरोदरपणाविषयी त्यांचा दिर आणि सिद्धुचे मोठे काका चमकौर सिंह यांनी माहिती दिली होती. सध्या त्याच्या आईला चंदीगडमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या मुसेवाला घराण्याला मिळणाऱ्या वारसांबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच आता चरण कौर सिंह रुग्णालयात दाखल झाली असून लवकरच नव्या पाहुण्यांचं आगमन मुसेवालांकडे होणार आहे.
View this post on Instagram
पंजाबमधील श्रीमंत गायकांपैकी आहे मुसेवाला
पंजाबमधील अल्पावधीतच लोकप्रिय आणि श्रीमंत झालेल्या गायकांमध्ये सिद्धू मुसेवालाचा समावेश होतो. सिद्धू मुसेवालाच्या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या झाल्यानंतर त्याची काही गाणी रिलीज झाली होती. त्यांनाही लोकांनी तुफान प्रतिसाद दिला.
मृत्यनंतरही गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत असलेला गायक
सिद्धू मुसेवाला यांनी गीतलेखनापासून त्यांच्या संगीतक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. गायनापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना पुढे राजकारणापर्यंत घेऊन गेला. आपल्या गायकीच्या जोरावर सिद्धू मुसेवाला यांनी वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी तरुणाईला वेड लावले होते. आता मृत्यूनंतरही ते त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. त्यांची गाणी आजही अनेक पार्ट्यांमध्ये किंवा लग्नसोहळ्यांत वाजवली जातात.
ही बातमी वाचा :
बधाई हो ! सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर गरोदर, घरी येणार नवा पाहुणा