Lakshmichya Pavalani: काय होणार जेव्हा नवरीच्या जागी कला दिसणार? लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत नवा ट्वीस्ट
Lakshmichya Pavalani: स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये सध्या अद्वैतच्या लग्नाची धूम पाहायला मिळत आहे.
Lakshmichya Pavalani: 'स्टार प्रवाह' (Star Pravah) वाहिनीवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' (Lakshmichya Pavalani) मालिका ही अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तीन बहिणी आणि त्यांच्या आईची मुलींच्या लग्नासाठी सुरु असलेली धडपड असा सर्वसाधारणपणे आशय आणि गोष्ट या मालिकेची आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून अद्वैत आणि कलाच्या लग्नाची धूम प्रेक्षकांना पाहायला मिळत होती. पण या मालिकेत एक मोठा ट्वीस्ट आता आलाय. कारण नयना आणि अद्वैतचं लग्न ठरलं असताना नयना लग्नाच्या दिवशी अद्वैत चांदेकरचा भाऊ राहुलसोबत पळून जाते.
या सगळ्यामध्ये नैनाची आई आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असते, तिथे कला पोहचले आणि आईला समजावण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी संगीता कलाला नवरी म्हणून उभं करते. लग्नाचे सगळे विधी कला अद्वैतसोबत करते पण मंगळसूत्र घालताना मात्र कला तिचा चेहरा सगळ्यांसमोर उघड करते. त्यामुळे आता या मालिकेत काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तसेच अद्वैत कलासोबत संसार मांडणार की तो हे लग्न मोडणार याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यामुळे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका रंजक वळणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
अद्वैतच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी कोण येणार?
नियतीच्या मनातही अद्वैत आणि कलाने एकत्र यावं ही एकच इच्छा आहे. साखरपुडा, हळद आणि संगीत तर पार पडलंय. तसेच लग्नाचा सोहळा देखील जवळपास होत आहे. पण नयनाने राहुलसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चांदेकरांच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी कोण येणार नयना येणार की कला? हे लवकरच स्पष्ट होईल.
'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेची स्टार कास्ट
अक्षर कोठारी, ईशा केसकर, दिपाली पानसरे आणि किशोरी आंबिये हे कलाकार लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अभिनेत्री इशा केसकर ही "लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत कला खरे ही भूमिका साकारत आहे.