Lai Avadtes Tu Mala Marathi Serial Track: सानिका गुन्ह्याच्या मुळाशी जाणार, सत्याचा उलघडा होणार; 'लय आवडतेस तू मला'मध्ये पुढे काय घडणार?
Lai Avadtes Tu Mala Marathi Serial Track: येत्या भागात सानिका एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे आणि तो म्हणजे, सईला माफ करून पुन्हा संधी देण्याचा. पण परिस्थिती तशी सोपी नाही. पुढे काय घडणार?

Lai Avadtes Tu Mala Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) लय आवडतेस तू मला (Lai Avadtes Tu Mala) मालिकेत (Marathi Serial) सध्या उत्कंठावर्धक वळण आलं आहे. कमलच्या अपहरणानंतर सरकार, सानिका आणि त्यांच्या टीमनं धाडसानं कमलचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत. कमल अखेरीस परतली असली तरी तिच्या अपहरणामागचं खरं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलीसही तपास करत आहेत, पण सानिकाचं मन सांगतंय की संकट टळलेलं नाही. तर दुसरीकडे पंकजा काही तरी मोठं कट रचत असल्याचं स्पष्ट होतं. सईच्या मदतीनं ती सानिकाला संपवण्याचा प्लॅन आखते आहे. सई मात्र वेगळ्याच विचारात आहे - एकीकडे तिला पंकजासोबतचं नातं टिकवायचं आहे, तर दुसरीकडे घरच्यांची सहानुभूती मिळवायचीय. ती सानिकाच्या हातात लागलेल्या मोबाईलच्या आधारे खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार करते. पुढे काय होणार सानिका कसा शोध लावणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
येत्या भागात सानिका एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे आणि तो म्हणजे, सईला माफ करून पुन्हा संधी देण्याचा. पण परिस्थिती तशी सोपी नाही. पंकजा गुंडांना सानिकावर हल्ला करण्यास पाठवते आणि पुढे एक मोठा संघर्ष होतो. सानिका आणि सरकार यांच्या स्मार्ट खेळीमुळे गुंडांना पळवून लावलं जातं, पण पंकजाच्या हाती महत्त्वाचा पुरावा - मोबाईल - लागतो. मात्र सईकडे अजून एक धागा लागतो - तिने गुंडाला ओळखलं आहे आणि त्याचं गाव माहीत आहे. सरकार तिच्यावर विश्वास टाकतो आणि तिला सोबत घेऊन गुन्हेगारापर्यंत पोहोचतो. अखेरीस एक मोठं सत्य उघड होतं - या सर्व प्रकारामागे कोण आहे याचा उलगडा होतो.
येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना अनेक धक्के बसणार आहेत. पंकजाचं खोटं सानिकासमोर उघड होणार का? साहेबरावांचं अचानक प्रकटण कोणता नवा ट्विस्ट घेऊन येणार? सानिका अखेरीस पंकजाचा मुखवटा फाडणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मालिकेचे पुढचे भाग चुकवू नका… कारण खऱ्या संघर्षाची सुरुवात आता होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Chhaava OTT Release Date: कन्फर्म! 'छावा'ची ओटीटी रिलीज डेट जाहीर; कधी आणि कुठे पाहायला मिळणार?


















