एक्स्प्लोर

Krushnaichya Leki: 'ज्या दिवशी समजलं की निवेदिता सराफ मुख्य भूमिकेत..'; अभिनेत्यानं सुरु केला मारुतीरायाचा धावा; झी मराठीच्या अभिनेत्यानं सांगितला अनुभव

या भूमिकेच्या तयारीबाबत रोहितने काही खास अनुभव शेअर केले आहेत. त्याने सांगितलं की, ही संधी त्याला अनपेक्षितपणे मिळाली

Zee Marathi: झी मराठीवरील आगामी ‘कृष्णाईच्या लेकी' या नव्या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या मालिकेत अभिनेता रोहित परशुराम ‘शंकर’ ही दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी ‘कमळी’ मालिकेत अर्जुनची भूमिका साकारत रोहितने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. आता नव्या भूमिकेसाठी तो पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.

कशी मिळाली मालिकेत संधी?

या भूमिकेच्या तयारीबाबत रोहितने काही खास अनुभव शेअर केले आहेत. त्याने सांगितलं की, ही संधी त्याला अनपेक्षितपणे मिळाली. " कमळी च्या सेटवर मी आदित्यला, म्हणजेच बंड्याला, सहज भेटायला गेलो होतो. त्यावेळी अनिकेत साने दिग्दर्शक झी मराठीवर नवीन मालिका घेऊन येत आहेत असं समजलं. आणि त्यांच्या नवीन मालिकेच्या ऑडिशन्स सुरू होत्या.  मी लगेच सरांना भेटलो, ऑडिशन दिली. त्यानंतर अनेक राऊंड्स ऑफ ऑडिशन्स झाले, सीन वर्क झालं आणि अखेर झी मराठीने मला पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं. मी कोल्हापुरी भाषा आणि त्याचा लहेजा शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्यासोबतच भरपूर व्यायाम, योग्य आहार आणि नियमित दिनचर्या पाळतोय. स्क्रिप्ट आणि स्क्रिनप्ले यांचं सखोल वाचन करतोय. साताऱ्यासोबत माझं एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं आहे आणि या मालिकेचा मुहूर्तही साताऱ्यात झाला. त्यामुळे आनंद, उत्सुकता आणि भावुकता अशा अनेक भावना मनात घेऊन मी पहिल्या दिवसाचं शूटिंग केलं."

ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफांची मुख्य भूमिका..

रोहितने यावेळी मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत काम करण्याबद्दलही भावना व्यक्त केल्या. त्याच्यासाठी हा अनुभव खूप खास असल्याचं त्याने सांगितलं. "ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत, त्या दिवशी मी अक्षरशः मारुतीरायाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की मला ही मालिका मिळू दे. ताईंच्या प्रोजेक्टमध्ये आपण फक्त हातात भाला घेऊन जरी उभे असलो, तरीही मला सार्थक झाल्यासारखं वाटलं असतं.  त्यांच्यासोबत सेटवर वावरताना मला माझा संपूर्ण प्रवास आठवतो आणि खरंच मेहनतीला देव, फळ देतो . अशा दिग्गज अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासोबतचा प्रत्येक सीन माझ्यासाठी एक शिकण्याचा अनुभव असणार आहे."

नवी कथा, दमदार कलाकार आणि भावनिक नात्यांची गुंफण असलेली ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ही नवी मालिका पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक झाले आहेत. ‘कृष्णाईच्या लेकी’ दररोज संध्याकाळी ७ वाजता फक्त झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget