प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री लग्नबंधनात अडकली; गायकासोबत ख्रिश्चन पद्धतीने विवाह, PHOTO व्हायरल
Kriti Sanons Sister Nupur Sanon Marries Singer: कृती सेननची धाकटी बहीण नुपूर सेनन लग्नबंधनात अडकली. नुपूर सेनन आणि गायक स्टेबिन बेन यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.

Kriti Sanons Sister Nupur Sanon Marries Singer: बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननची धाकटी बहीण नुपूर सेनन लग्नबंधनात अडकली आहे. तिनं प्रियकर आणि लोकप्रिय गायक स्टेबिन बेनशी ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. सध्या या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कुटुंब आणि सिनेसृष्टीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या लग्नसोहळ्यासाठी खास अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या व्हाईट गाऊनमध्ये अभिनेत्री सुरेख दिसत होती. दोघांचा हा विवाहसोहळा उदयपूरमध्ये पार पडला असल्याची माहिती आहे. दरम्यान, लग्नानंतर कॉकटेल पार्टीचंही आयोजन करण्यात आलं. सध्या दोघांचे लग्नातील फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अभिनेत्री नुपूर सेननने ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला
View this post on Instagram
अभिनेत्री नुपूर सेनन आणि गायक स्टेबिन बेन या दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला होता. तर, स्टेबिनने पांढऱ्या क्रिम रंगाचा सूट घातला होता. दोघे प्रचंड आनंदात आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. ईटाइम्समधील एका वृत्तानुसार, नुपूस सेनन आणि स्टेबिन बेन यांनी शनिवारी उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. या सोहळ्यात मोजक्या लोकांना आमंत्रण होते. कुटुंब आणि काही जवळचे नातेवाईक या लग्न सोहळ्यात उपस्थित होते.
शाही लग्नानंतर कॉकटेल पार्टीचे आयोजन
दरम्यान, या लग्नानंतर सायंकाळी एका ग्लॅमरस कॉकटेल पार्टीचे आयोजन करण्यात आले. ही पार्टी अनेकांनी आनंदात साजरी केली. या पार्टीला देखील मोजकेच लोक उपस्थित होते. या लग्नाचे आणि पार्टीचे फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. यावेळी नुपूर सेननची बहीण कृती सेनन हिनं कार्यक्रमात ठुमके लगावले. या लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
लग्नाआधी गुडघ्यावर बसून प्रपोज
दरम्यान, लग्नाआधी 3 जानेवारीला स्टेबिन बेनने नुपूरला लग्नासाठी प्रपोज केले होते. स्टेबिनने एका गुडघ्यावर बसून नुपूरच्या बोटामध्ये अंगठी घातली होती. आज त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या कपलचं लग्न उदयपूर येथील फेअरमोंट पॅलेसमध्ये पार पडले. दोघांच्या रॉयल वेडिंगचे अनेक फोटो सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी पोस्टवर कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
























