(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kriti Sanon : अभिनेत्री कृती सेनेनला UAE ने दिला 'गोल्डन व्हिजा', या visa चे फायदे काय?
Kriti Sanon : नॅशनल अवॉर्ड विजेत्या अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) हिला UAE ने गोल्डन व्हिजा (Golden Visa) दिला आहे. यापूर्वीही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना हा व्हिजा मिळाला होता. या यादीत आता कृती सेननचाही समावेश झाला आहे.
Kriti Sanon : नॅशनल अवॉर्ड विजेत्या अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) हिला UAE ने गोल्डन व्हिजा (Golden Visa) दिला आहे. यापूर्वीही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना हा व्हिजा मिळाला होता. या यादीत आता कृती सेननचाही समावेश झाला आहे. ECH डिजीटलचे सीईओ इकबाल मार्कोनी यांच्याकडून कृतीला हा गोल्डन व्हिजा देण्यात आलाय. अभिनेत्री कृती सेननने हा व्हिजा मिळाल्यानंतर आभार मानले आहेत. कृती (Kriti Sanon) म्हणाली, युएईचा गोल्डन व्हिजा मिळणे, ही सन्मानाची बाब आहे. माझ्यासाठी दुबई फार खास आहे. मी दुबईच्या संस्कृतीचा हिस्सा बनण्यासाठी उत्सुक आहे.
युएईच्या गोल्डन व्हिजाचे फायदे काय?
अभिनेत्री कृती सेसनला (Kriti Sanon) मिळालेल्या गोल्डन व्हिजाचे अनेक फायदे आहेत. जगभरातील टॉप डेस्टिनेशंसमध्ये युएईचा देखील समावेश आहे. युएईकडून अर्थव्यवस्थेची ग्रोथ व्हावी, यादृष्टीने टॉप टॅलेंटेड लोकांना आकर्षित करण्यासाठी हा व्हिजा देण्यात येतो. देशातील गुंतवणूक वाढावी, हा गोल्डन व्हिजा देण्यामागील उद्देश आहे. हा गोल्डन व्हिजा युएईमध्ये मोठ्या कालखंडासाठी वास्तव्य करण्यास परवानगी देतो. हा व्हिजा मिळाल्यानंतर 10 वर्षे युएईमध्ये वास्तव्य करण्याचा मार्ग मोकळा होतो. गोल्डन व्हिजा धारक मंडळी कोणत्याही कंपनीच्या, स्थानिकांच्या सहाकार्याशिवाय देशात राहू शकतात. यापूर्वी यासाठी प्रायोजकाची गरज भासत होती. याशिवाय गोल्डन व्हिजा धारकांना 3 कामगारांनाही स्पॉन्सर करता येते. गोल्डन व्हिजाचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला युएईमध्ये गुंतवणूक देखील करावी लागते.
2019 पासून व्हिजा देण्यास झाली होती सुरुवात (Golden Visa)
युएईकडून 2019 पासून हा गोल्डन व्हिजा देण्यास सुरुवात झाली. सामान्यपणे व्हिजा मिळवण्यासाठी एका स्पॉन्सरची गरज असते. मात्र, गोल्डन व्हिजासाठी कोणत्याही स्पॉन्सरची गरज भासत नाही. त्यामुळे युएईचा गोल्डन व्हिजा महत्वपूर्ण मानला जातो.
यापूर्वी कोणाला मिळालाय गोल्डन व्हिजा (Golden Visa)
बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना यापूर्वी युएईचा गोल्डन व्हिजा मिळालाय. युएई सरकारने यापूर्वी शारुख खान, संजय दत्त, सानिया मिर्झा, बोनी कपूर, वरुण धवन, मौनी रॉय, उर्वशी रौतेला, सुनील शेट्टी, नेहा कक्कर, रणवीर सिंह, कमल हसन, फराह खान, सोनू सूद आणि अमाला पॉल यांना गोल्डन व्हिजा (Golden Visa) दिला आहे.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या