Kishore Kumar Death Anniversary: एक, दोन नाहीतर तब्बल चार लग्न, तीदेखील स्टार हिरोईन्ससोबत; दुसरी पत्नी तर बॉलिवूडची ब्लॉकबस्टर स्टार; ओळखलं का कोण?
Kishore Kumar Death Anniversary: हा फिल्मस्टार केवळ गायक नव्हता तर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकार देखील होता. त्याचा 'चलती का नाम गाडी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.

Kishore Kumar Death Anniversary: भारतीय चित्रपटसृष्टीच्या (Indian Film Industry) सुवर्णकाळात लाखो हृदयांना स्पर्श करणारा आणि संगीताच्या जगात अमर झालेला आवाज ऐकायला मिळाला. किशोर कुमार (Kishor Kumar) हे केवळ गायक नव्हते, तर एक बहुमुखी कलाकार होते, ज्यांना 'किशोर दा' (Kishor Da) म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या मखमली आवाजानं आणि मध्येच विराम देण्याची अनोखी शैली त्यांना एक उत्कृष्ट संगीतकार बनवते.
4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा इथे जन्मलेल्या किशोर कुमार यांचं खरं नाव आभास कुमार गांगुली होतं. त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार हे आधीच एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते (Bollywood Actor) होते, ज्यामुळे किशोर कुमार यांचा सिनेसृष्टीत येण्याचा रस्ता मोकळा झाला. अशोक कुमार अभिनयात उत्कृष्ट होते, तर किशोर कुमार यांनी त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.
किशोर कुमार यांचं पहिलं गाणं
किशोर कुमार यांनी सुरुवातील अभिनयातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. पण, त्यांचा आत्मा संगीतात होता. किशोर कुमार यांनी 1946 मध्ये 'शिकारी' या सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं. पण, त्यांना अभिनयात अजिबात रस नव्हता. त्यांना के.एल. सैगल यांच्यासारखं गायक व्हायचं होतं. 1948 मध्ये त्यांनी खेमचंद प्रकाश यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'जिद्दी' चित्रपटात देव आनंद यांच्यासाठी त्यांचं पहिलं गाणं 'मरने की दुआएं क्यूं मांगू, जीने की तमन्ना कौन करे' गायलं. त्यानंतर एक संगीतकार, गायक म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळवलं आणि कधीच मागे वळून पाहिलं नाही.
किशोर कुमार यांची जोडी कोणासोबत जुळली?
किशोर कुमार हा असा आवाज होता, ज्यानं हिंदी चित्रपटसृष्टीला 'मेरे सपनो की रानी', 'पल पल दिल के पास' आणि 'जिंदगी एक सफर है सुहाना' अशी असंख्य सदाबहार गाणी दिली. त्यांचं गाण्याचं कसब जादुसारखंच होतं. ते रोमँटिक किंवा उत्साही गाणी गायचेच, पण त्यांनी दुःख व्यक्त करणारी अगदी थेट काळजाला भिडणारी गाणीही गायली. ते प्रत्येक भावना परिपूर्णतेनं गाण्यातून व्यक्त करायचे. त्यांच्या आवाजातील चैतन्यामुळे ते प्रत्येक पिढीचे आवडते बनले. त्यांच्या आवाजानं प्रत्येक भावना जिवंत केली. त्यांनी आरडी बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल सारख्या संगीतकारांसोबत काम करून अनेक धमाकेदार गाणी गायली. किशोर कुमार यांचं संगीतकार आरडी बर्मन यांच्याशी एक खास नातं होतं. दोघांनी 'कटी पतंग' आणि 'अमर प्रेम' यासह असंख्य हिट गाणी दिली.
चार लग्न केली, चारही अभिनेत्रींसोबत...
किशोर कुमार हे केवळ गायक नव्हते, तर एक उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि संगीतकार देखील होते. त्यांचा 'चलती का नाम गाडी' हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये अजूनही लोकप्रिय आहे. त्यांच्या विनोदी शैलीनं आणि सहज अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं, पण किशोर कुमार यांचं वैयक्तिक जीवन त्यांच्या कलेइतकंच गुंतागुंतीचं होतं. रुमा घोष, मधुबाला, योगिता बाली आणि लीना चंदावरकर या अभिनेत्रींसोबत चार लग्न केली, त्यानंतर किशोर कदम यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले.
किशोर कुमार यांचं 13 ऑक्टोबर 1987 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, पण त्यांचा आवाज आजही जिवंत आहे. मग ते रेडिओवर असो, संगीत मैफिलींमध्ये असो किंवा लोकांच्या हृदयात...
'पल पल दिल के पास'चा रोमँटिक सूर असो किंवा 'एक लडकी भिगी भागी सी' गाण्यातला खट्याळपणा असो, किशोर कुमार यांची जादू कधीही कमी होणार नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















