' त्यावेळी निर्माता म्हणाला, कोणतीच अभिनेत्री तुझ्यासोबत काम करायला तयार नाही , किरण मानेंनी खदखद बोलून दाखवली
Kiran Mane : कोणतीच हिरोईन माझ्यासोबत काम करायला तयार नव्हती, अशी खदखद अभिनेते किरण माने यांनी बोलून दाखवली. ते एका मुलाखतीत बोलत होते.

Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी नाटक आणि सिनेमाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांची सातत्याने मने जिकंली. विशेषत: मराठी मालिकांमधील त्यांच्या काही भूमिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरल्या. मात्र, काही वेळेस त्यांना सिनेसृष्टीत रिजेक्शनचा सामना देखील करावा लागला. किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सिनेक्षेत्रातील रिजेक्शनचा अनुभव सांगतला आहे. किरण माने (Kiran Mane) काय काय म्हणाले? जाणून घेऊयात..
किरण माने (Kiran Mane) म्हणाले, परफेक्ट मिसमॅच हे नाटक मी बऱ्याच निर्मात्यांकडे घेऊन जायचो. त्यावेळी आम्ही बऱ्याच हिरोईनकडे जायचो. मंगेश कदमला ते नाटक खूप आवडलं होतं. तो म्हणाला, मला याचं दिग्दर्शन करायला आवडेल. आम्ही हे नाटक 2-3 अभिनेत्रींना वाचून दाखवलं. आम्ही म्हणालो की आधी अभिनेता आणि अभिनेत्री निश्चित करुया. त्यानंतर आपल्याला निर्माता मिळेल. तर मराठीतील एक मोठी अभिनेत्री आहे. तिला नाटक वाचून दाखवलं. तिला नाटक खूप आवडलं. मात्र, नंतर तिने काहीच कळवलं नाही. त्यानंतर मी एका निर्मात्याकडे गेलो. त्या निर्मित्याला नाटक वाचून दाखवलं. तो निर्माता म्हणाला नाटक खूप छान आहे. पण तुझ्याबरोबर काम करायला कोणतीच अभिनेत्री तयार नाही. असं का मी विचारलं. त्यावेळी तो निर्माता म्हणाला, तू काल अमूक-अमूक अभिनेत्रीला नाटक वाचून दाखवलं. तिचा मला फोन आला होता. नाटक खूप चांगलं आहे, पण आपल्यातला कोणी नाही का? मी त्यांना म्हटलं असं काय म्हणताय. मला फार वाईट वाटलं होतं. तो रोमँटिक रोल आहे. तू सुट होत आहेस. सातारचा रांगडा गडी वगैरे..असं त्यांनी सांगितलं. नाटकात बिल्डिंग पाडणारा कंत्राटदार असतो आणि मुलगी पुण्याची असते. लग्नाचं वय उलटून गेलेले पण लग्न न झालेले, असे कॅरेक्टर आहेत. लव्हस्टोरी होती, खूप छान होती.
पुढे बोलताना किरण माने म्हणाले, तो म्हणाला मला या नाटकासाठी टॉपची हिरोईन पाहिजे. पण तुझ्याबरोबर कोणी काम करणार नाही. मला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, मी याला घेऊन करु शकतो. त्याला घेऊन करु शकतो. मी म्हटलं त्यांचा रोलच नाही तो.. तू माझं नाटक पाहून मला भेटायला आला होता. तू आता बोलतोयस.. त्यानंतर मला जाणवलं की, आपण कुठल्या कंपूतले नाहीत. आपल्यातला कोणी नाही का? हे त्या अभिनेत्रीचं वाक्य माझ्या मनात राहिलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'सलमान खानसोबत काम केलं तर ..', कपिल शर्माला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी, ऑडिओ क्लीप समोर
























