हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येपूर्वी पार्किंगमध्ये मोठा वाद, CCTV फुटेज समोर; आरोपींचा क्रूर चेहरा समोर
Huma Qureshi cousin asif qureshi killed : दिल्लीतील जंगपुरा भोगल मार्केटमध्ये पार्किंगच्या वादात हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची हत्या करण्यात आली आहे.

Huma Qureshi cousin asif qureshi killed : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची दिल्लीत धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या करण्यात आलीये. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील जंगपुरा भोगल बाजारपेठेत गुरुवारी (7 ऑगस्ट 2025) उशिरा रात्री पार्किंगच्या वादातून बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याला संपवण्यात आलंय. दोन तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांचा जीव घेतला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. काही कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपी संतापून आसिफवर तुटून पडलेले सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहेत. एका आरोपीच्या हातात धारदार शस्त्र असून तो हल्ला करताना पाहायला मिळतोय.
सूत्रांच्या माहितीनुसार, वादाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा स्कूटी गेटसमोरून हटवून बाजूला लावण्यास सांगितले गेले. दिसायला किरकोळ असलेला हा वाद हिंसक झाला. घटनेत सहभागी मुख्य आरोपी गौतम (वय 18) आणि उज्ज्वल (19) यांनी मिळून आसिफवर हल्ला केला. उज्ज्वलने प्रथम वार केला, त्यानंतर गौतमनेही हल्ला चढवला. घटनेच्या वेळी उपस्थित जमावाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, इतकेच नव्हे तर आसिफच्या पत्नीनेही हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आसिफ गंभीर जखमी झाले होते.
आसिफ कुरेशीचा रुग्णालयात मृत्यू, आरोपींची ओळख पटली
गंभीर जखमी आसिफला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवली असून, ते सख्खे भाऊ असल्याचे समजते. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे.
आसिफ कुरेशीच्या हत्येचा कट यापूर्वी रचला होता, नातेवाईकांचा दावा
आसिफ कुरेशीच्या हत्येचा कट यापूर्वी रचला होता, असा दावा हुमा कुरेशीच्या नातेवाईकांनी केला आहे. आसिफच्या नातेवाईक जावेद यांनी सांगितले की, याआधीही दोन वेळा मुद्दामून त्याच्याशी वाद घडवून आणले होते आणि त्याच्यावर हल्ले झाले होते. त्यांचा आरोप आहे की, या वेळेस आरोपींनी संधी साधून त्याचा खून केला.
सीसीटीव्ही फुटेज – हत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा
संपूर्ण हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्यात दोन्ही आरोपी आसिफवर शस्त्राने हल्ला करताना स्पष्ट दिसतात. हे फुटेज पोलिस तपासात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























