Kiran Gaikwad Wedding : शुभमंगल सावधान! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर अडकले लग्नबंधनात
Kiran Gaikwad Wedding : अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हे दोघेही नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
Kiran Gaikwad and Vaishanavi Kalyankar Wedding : अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर (Vaishanavi Kalyankar) हे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. किरण आणि वैष्णवीने काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी दोघे लग्नबंधनातही अडकले. त्यांच्या लग्नसोहळ्याला त्यांच्या अनेक कलाकार मित्रमंडळींनीही हजेरी लावली होती. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
वैष्णवी कल्याणकर ही झी मराठीवरील तु चाल पुढं या मालिकेतून घराघरांत पोहचली. दरम्यान वैष्णवी आणि किरणच्या साखरपुडा,संगीत, मेहंदी आणि हळद समारंभाचेही फोटो समोर आले होते. अनेकांनी यावर कमेंट्स करत त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
दिग्दर्शक म्हणून पदार्पण
कसदार अभिनेता म्हणून किरण गायकवाडने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने निवडलेल्या मालिका, चित्रपटांतून त्याचा अभिनेता म्हणून असलेला कल दिसतो. त्यामुळे आता दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना त्याने चित्रपटासाठी निवडलेला विषय काय, या बाबत कुतूहल आहे. त्याशिवाय "एफ.आय.आर. नंबर 469" या नावातून हे कथानक पोलीस तपासाचं असल्याचा अंदाज बांधता येत असला तरी विषय समजून घेण्यासाठी चित्रपटाचा ट्रेलर येईपर्यंत प्रेक्षकांना अजून थोडे थांबावं लागणार आहे.
किरणने दिली होती प्रेमाची कबुली
किरणने काही दिवसांपूर्वी वैष्णवीसोबत फोटो शेअर करत म्हटलं होतं की, “तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे “मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील ,मंत्री पद वाटत राहतील ,त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर” !
View this post on Instagram
View this post on Instagram